बुलढाणा

25 फेब्रुवारीला शेगाव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा:राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते होणार आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन

केंद्रिय आयुषमंत्री प्रताराव जाधव यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती बुलढाणा :दि , ०७ (जिल्हा प्रतिनिधी)भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने येत्या 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगांव येथे “राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. या आरोगयमेळाव्याचे उद्घाटन…

जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य खरेदी गैरव्यवहार, एसीबीची चौकसीसाठी परवानगीची मागणी

देऊळगाव राजा /गणेश मुंढे :-जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना काळात जवळपास ९९ कोटी रुपयांच्या साहित्य खरेदी व विक्री उपकरणे प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून आता प्रशासकीय आणि कायदेशीर हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक…

नांदुरा शहरात ५०० फुटी भव्य तिरंगा महारॅलीने घुमला राष्ट्रप्रेमाचा हुंकार!

नांदुरा (प्रतिनिधी): भारतीय लोकशाहीचा उत्सव ‘प्रजासत्ताक दिन’ आणि ‘राष्ट्रीय मतदार दिना’चे औचित्य साधून आज नांदुरा शहरात एक ऐतिहासिक सोहळा पार पडला. ५०० फूट लांब भव्य तिरंगा ध्वजासह निघालेल्या महाकाय रॅलीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. या महारॅलीला नांदुरा शहराच्या नगराध्यक्षा…

नांदुरा शहरात २५ जानेवारीला १५० फूट लांब तिरंग्यासह निघणार भव्य ‘महारॅली’

भारतीय ज्ञानपीठ शाळेपासून होणार प्रारंभ; तहसीलदार अजितराव जंगम यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन नांदुरा:भारतीय लोकशाहीचा उत्सव आणि राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नांदुरा शहरात दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी एका ऐतिहासिक आणि अभूतपूर्व *’तिरंगा महारॅली’*चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे…

मलकापूर राष्ट्रीय महामार्गावर 53 वर भीषण अपघात; पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

मलकापूर :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत व्यक्तीचे नाव अनिल एकनाथ मालठाणे…

महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर !

जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘महसूल मित्र-सुलभ चॅटबॉट सेवा’ कार्यान्वित बुलढाणा, दि. ९ : शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता, वेग आणि सुलभता आणण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘डिजिटल क्रांती’कडे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ हा…

बुलढाणा

डाक विभागात एजंटसाठी अर्ज मागविले; 28 जानेवारीला उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलढाणा, (जिमाका) दि. 06:भारतीय डाक विभागाकडून डाक जीवन विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील टपाल जीवन विमा योजनेसाठी थेट अभिकर्ता व क्षेत्र अधिकारी यांची नेमणूक करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रासह दि. 28 जानेवारी 2026 रोजी उपस्थित राहावे, असे…

बुलढाणा

बुलढाण्यात शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिर

बुलढाणा, (जिमाका) दि. 7:राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या ड्रग अव्हेरनेस अँड वेलनेस नेव्हीगेशन फार ड्रग फ्रि इंडीया (Drug Awareness and Wellness Navigation for Drug Free India) योजना 2025 अंतर्गत दि. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता राजर्षी…

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हलला आग; ३६ प्रवासी सुखरूप – मोठा अनर्थ टळला

मेहकर तालुक्यालगत असलेल्या समृद्धी महामार्गावर मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एक मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक ३००.१ येथे नागपूरहून नाशिककडे जाणाऱ्या एका ट्रॅव्हल वाहनाला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग…

बसने तिघांना चिरडले

बुलढाणा-अजिंठा राज्य मार्गावरील धाडनजीक झालेल्या भीषण अपघातात तिन युवकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राज्य परिवहन मंडळाची बस आणि दुचाकीची भरवेगात धडक होऊन दुचाकी बसखाली आल्याने ही भीषण दुर्घटना घडली. तिन्ही मृतक ढालसावंगी येथील रहिवासी होते. आज सोमवारी, ५ जानेवारीला संध्याकाळी हा…