टॉप स्टोरी

Top Story:बिनविरोध निवड प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी

बिनविरोध निवड प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशीची मागणी
राज्यात मुंबईसहित २९ महापालिकांच्या निवडणुकांचा फंड रंगला आहे. राज्यात ६७ ठिकाणी सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव व काँग्रेस नेते समीर गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेषतः: हि चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत असेही या पक्षांनी म्ह्टले आहे.
………………………..

परळच्या टाटा रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, रुग्णालय परिसर रिकामा
मुंबईतील परळ भागात असलेल्या जगप्रसिद्ध टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर पोलीस प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून तडकाफडकी रुग्णालय परिसर रिकामा करण्यात आला आहे. सध्या घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल झाले असून रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्याची आणि कानाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे.
……………………………….

भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांविरुद्ध अंतर्गत गट तयार, नाना पटोले
राज्यामध्ये भाजप युतीचे ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी रान उठविले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणे वागत आहे आणि हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपमध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांविरुद्ध मोठा अंतर्गत गट सक्रिय झाला आहे. नाराज सुधीर मुनगंटीवार यांच्या मनात काय चाललंय हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे. भविष्यात मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता वर्तवली त्यांनी आहे
…………..

ओवेसींच्या अकोला सभेत चेंगराचेंगरी, पोलिसांकडून लाठीचार्ज
अकोल्यातील ओवेसींच्या प्रचार सभेनंतर स्टेजकडे जमाव धावल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. नियोजनाअभावी हा प्रकार घडला असल्याची चर्चा असून ओवेसी आणि आयोजकांच्या बेजबाबदारीवर टीका होत आहे.
….

नारायण राणेंचा राजकीय निवृत्तीच्या संकेतावर पडदा
चिपळूणमधील कार्यक्रमात भाषणादरम्यान माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांना भोवळ आली. त्यांचा आवाज बसल्याने त्यांनी भाषणही आटोपते घेतले.माध्यमांना प्रकृती ठीक असल्याचे सांगत निवृत्तीचे संकेत कोणी दिले असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला . मी रिझल्ट देऊ शकलो नाही तर माझ्या पदाचा उपयोग काय असे मी म्हणालो. असे म्हणत त्यांनी राजकीय निवृत्तीच्या संकेतांवर पडदा टाकला.
……………………………………….
.
शिवसेना मनसे शाखांना भेटी देण्यावर ठाकरे बंधूंवर बावनकुळे यांचा निशाणा
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसे शाखांना महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भेटी देत आहेत. या भेटींवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिखट समाचार घेतला आहे. राज ठाकरे यांच्या सभांना आता गर्दी होत नाही, त्याचाच परिणाम म्हणजे ह्या भेटी आहेत.

निवडणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे ? चंद्रशेखर बावनकुळे
महानगरपालिका निवडणुकीत अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप सुरु आहेत. यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिसवाल केला आहे कि, निवणूक बिनविरोध व्हायला काय हरकत आहे? हा एक चांगला पायंडा आहे. यामध्ये नियमांचे उल्लंघन होण्यासारखे काय आहे?

मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी दौऱ्यावर असताना त्यानी आपल्या भाषेत घोषणा केली कि देवा भाऊ मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आता लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या ठेवायचे नाही तर लखपती बनवायचे आहे.
………

उमर खालिद आणि शरजील इमाम याना जमीन नाकारला
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम याना जामीन देण्यास नकार दिला आहे. मात्र इतर ५ आरोपींना १२ अटींसह जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले कि उमर आणि शारजील एक वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करू शकत नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *