आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे काका_ पुतणे, शरद पवार आणि अजित पवार यांनी आखलेल्या स्ट्रॅटेजीनुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस कडून लढणाऱ्या उमेदवाराकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जिथे फायद्याचे ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार अशी माहिती समोर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अजित पवार यांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद निवडणुकीसाठी स्ट्रॅटेजी आखली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार आहे.
याची जबाबदारी तुतारीच्या चिन्हावर खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर देण्यात आली आहे. तर शेजारच्या आंबेगाव तालुक्यात मात्र घड्याळ आणि तुतारी या चिन्हावर उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील सर्व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढणार आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी आखलेली स्ट्रॅटेजी त्यांना कितपत लाभ देईल याकडे लक्ष लागलेले आहे.




