मुरबाड

मुरबाड नगरपंचायतने उभारलेला आरो प्लांट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता!

मुरबाड, दि.६,प्रतिनिधी:मुरबाड नगरपंचायतीने आरओ प्लांट उभारल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने प्लांट किंवा दारूच्या दुकानाचे तात्काळ स्थलांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुरबाड नगरपंचायतीने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उभारलेला आरओ प्लांट सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनला आहे. हा आरओ प्लांट थेट भारत वाईन शॉपच्या अगदी जवळ उभारण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये नगरपंचायतीच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांचे म्हणणे आहे की शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचा हेतू योग्य असला तरी, निवडलेली जागा योग्य नाही.

या ठिकाणी महिलावर्ग, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक पिण्याचे पाणी घेण्यासाठी येतात, पण दारूच्या दुकानाजवळील दारुड्यांचा वावर, अस्वच्छता आणि गोंधळ यामुळे तेथे जाणे असुरक्षित वाटत आहे.यावेळी मुरबाड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने नगरपंचायतीला लेखी निवेदन देऊन आरओ प्लांट किंवा भारत वाईन शॉप तात्काळ स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. निवेदनात नागरिकांनी पाणी घेताना दारूच्या दुकानाजवळील वातावरणामुळे त्रास होतो.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *