नागपूर जिल्हा भिवापुर

आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान

भिवापूर ( निशा जांभुळे )येथील पंचायत समितीच्या सभागृहात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज दि. 6 जानेवारीला सकाळी पत्रकार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमाला ज्येष्ट पत्रकार पुरुषोत्तम भिसीकर,पंस गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव,माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, माजी उपसभापती कृष्णा घोडेस्वार, कॉग्रेस महिला अध्यक्षा छाया ढोणे, माजी कृउबा समिती उपसभापती वसंता ढोणे उपस्थित होते. प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मा. आमदार संजय मेश्राम व उपस्थित पत्रकारांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी आपल्या मार्गदर्शनात पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार मेश्राम यांच्या हस्ते संविधानाची उद्देशपत्रिका पत्रकार नरेंद्र ढोणे, ( दै.पुण्यनगरी ) राजेश जांभुळे ( दै. नवभारत दै. तरुणभारत ), पंढरी हिवसे (दै.देशोन्नीती ), समिर पडोळे ( दै.लोकमत, चिचाळा ), साबीर शेख ( लोकमत समाचार ), मो. तोफीक सौ. निशा जांभुळे महासागर डिजिट ल व दै. युवाराष्ट्र दर्शन ), कु.प्रिती जांभुळकर ( भिवापूर टाइम्स युट्यब चॅनल ) मो. तोफीक पटेल यांना प्रदान करण्यात आला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *