हल्ल्यात जखमी हिदायत पटेल यांचा मृत्यू
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आणि अकोल्यातील ज्येष्ठ नेते हिदायतउल्लाखा पटेल यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. अकोट तालुक्यातील मोहाळा या त्यांच्या मूळ गावी दुपारी मतीन पटेल यांच्या गटाने हिदायत पटेल यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पटेल हे गंभीर जखमी झाले होते. त्याना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले पण उपचार सुरु असताना आज त्यांचा मृत्यू झाला.
तर्री पोहा विथ देवा भाऊमधून मुख्यमंत्र्यांचे डॅमेज कंट्रोल
८ जानेवारी रोजी मुख्य
मंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत होणार आहे. तर्री पोहा विथ देवा भाऊ या विशेष संकल्पनेतून मुख्यमंत्री नागपूरच्या विकासासंदर्भात भाजपचे आणि स्वतःचे व्हिजन मांडणार आहेत. या कार्यक्रमात नागपुरातील विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. हि प्रकट मुलाखत अभिनेत्री स्पृहा जोशी आणि चला हवा येऊ द्या फेम भरत गणेशपुरे घेणार आहेत. या प्रकट मुलाखतीनंतर मुख्यमंत्री नागपूरकरांसोबत तर्री पोह्याचा आस्वाद घेणार आहेत. हि प्रकट मुलाखत शहरातील ५० मोट्या चौकात पडदे लावून हजारो नागरिकांना दाखविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या डॅमेज कंट्रोल मोहिमेचा भाग मानला जात आहे. ५१ माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्याने नाराज झालेल्या नगरसेवकांकडून पक्षाच्या उमेदवाराविरोधात छुपी मोहीम राबविण्यात येत आहे. असा अहवाल मिळाल्यामुळे डॅमेज कंट्रोलसाठी फडणवीस समोर आले आहेत.
अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेस आणि अजित पवार राष्ट्रवादीशी युती
अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये शिवसेना युतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपने काँग्रेस आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली आहे. येथे सदस्य संख्या ५९ असून सत्ता संख्या ३० आहे. भाजपचे १४, काँग्रेसचे १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ४ सही नगरसेवकांची संख्या आहे. त्यामुळे या युतीतून सत्तास्थापना होऊ शकते.यामुळे सदस्यसंख्य जास्त असूनही शिंदेसेनेला धक्का बसणार आहे.
…
इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला
एमआयएम पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची मोठी घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. या हल्ल्यानंतर मोठा जमाव निर्माण होऊन पोलिसांना लाठीचार्जे करावा लागला. इम्तियाझ जलील यांनी प्रतिक्रिया दिली कि हल्ला करणाऱ्या गुंडांना पालकमंत्री संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांचे पाठबळ आहे.
भाजप प्रचार गीताला निवडणूक आयोगाने नाकारले.
महानगरपालिकेच्या निवडणुकीला ७ दिवस बाकी असताना सर्वच पक्षांचा प्रचार शिंगेला पोहोचला आहे. त्यातच मुंबई महापालिकेसाठी भाजपने तयार केलेल्या प्रचार गीताला निवडणूक आयोगाने नाकारले आहे. भाजपने तयार केलेल्या या प्रचारगीतात भगवा या शब्दाचा वापर आला होता, पण निवडणूक आयोगाच्या
आचारसंहितेनुसार धार्मिक भावना आणि विशिष्ट रंगाचा राजकीय प्रचारात वापर करण्याबाबत कडक नियमावली आहे. या गीतातील भगवा शब्दावरून
आयोगाने या गीताला नाकारले आहे.
एमआयएमशी युतीवरून भाजप आमदार भारसाकळे रडारवर
सत्तेसाठी अकोटमध्ये भाजप नेत्यांनी एमआयएमशी केलेली युती हि तत्वशून्य आहे असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहे. यानंतर अवघ्या काही तासांतच हि युती तुटली आहे. यामुळे अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन अकोट विकास आघाडी स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे रडारवर आहेत.
रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने, देवेंद्र फडणवीस
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांच्यावरील वादग्रस्त विधानावरून लातूर राजकारणात जी खळबळ उडाली तो वाद
निवळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी येथे डॅमेज कंट्रोल केल्याचे दिसून येत आहे. आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाट आहे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक साद घातला.
स्वतःचा ब्राष्टाचार लपविण्यासाठी अजित पवारांची भाजपशी हातमिळवणी , महेश लांडगे यांचा हल्लाबोल
अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी भाजपसोबत आले आहे. त्यांनी पहिले आपल्या मुलाचा पराक्रम पाहावा. नंतर आमच्यावर टीका करावी. असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली, हर्षवर्धन सपकाळ
अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने हा परिणाम आहे. असा आरोप करून या हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.




