टॉप स्टोरी

Top Story:लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये

लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या ऐन तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 14 जानेवारी पूर्वी 3 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचा गेम चेंजर म्हणून लाडकी बहीण योजना समोर आली होती. महानगरपालिकांच्या निवडणुकीतही लाडकी बहीण योजना समोर करून मतांचे राजकारण करण्याचा हा घाट आहे असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दर महिन्याला दिले जाणारे पंधराशे रुपये कधी, केव्हा व कशाप्रकारे दिल्या जावेत याचा सर्वस्वी निर्णयसरकार घेते. दोन महिन्यांची एकत्रित रक्कम 3000 रुपये एन निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करणे हा आचारसंहिताचा भंग नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.
मित्रपक्षाकडूनच अपमानित झाल्याची शिंदे कार्यकर्त्यांची खंत
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढणारे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील कार्यकर्ते प्रत्यक्ष सामनेसामने आल्यानंतर उफाळलेल्या वादातून त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. छत्रपती संभाजी नगर आणि पुण्यात भाजप व शिंदे शिवसेना गटाची युती तुटल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद मुंबईतील प्रभाग क्रमांक 173 मध्ये प्रचारादरम्यान दिसून आले. प्रभाग क्रमांक 173 मध्ये भाजपच्या शिल्पा केळुस्कर आणि शिंदे सेनेच्या पूजा कांबळे यांच्यामध्ये लढत होत आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकाच परिसरात एकत्र आले आणि अचानक भाजपच्या कार्यकर्त्यांनी माईकवरून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ठाकरे गटाकडून शिंदे गटाला डिवचण्यासाठी वापरली जाणारी ही घोषणा आता थेट मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या गेल्याने शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध घोषणा झाल्या. यामुळे मित्र पक्षाकडूनच अपमानित झालो असल्याची भावना शिंदे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

भाजपचा मुंबई महापालिकेचा जाहीरनामा प्रसिद्ध
भाजपने नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

या जाहीरनाम्यात पोशीर व शिलार धरणातून पाणीपुरवठा,१०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि ५०० खाटांचे नवीन रुग्णालय,पीजी ते केजी शिक्षण मोफत,इंग्लिश आणि सीबीएसई माध्यमाच्या अतिरिक्त शाळा,५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी, ५०१ ते ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना ६० टक्के कर सवलत,सिडको सोसायट्यांमध्ये गरजेपोटी झालेल्या वाढीव बांधकामांचे नियमितीकरण,नवी मुंबई परिवहन सेवेमधून ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवाससुविधा कायम,
घणसोली ते ऐरोली पाम बीच मार्ग, तुर्भे ते खारघर रस्ते प्रकल्पाचे काम हाती घेणार,कोपरखैरणे ते विक्रोळी उड्डाणपूल निर्मितीसाठी प्रयत्न,
वाहतूक कोंडीच्या भागांमध्ये बहुमजली वाहनतळ, बिल्डरविरहित झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास जमिनीच्या मालकीसह, युवकांसाठी कौशल्य विकास केंद्र,नवी मुंबईतील सर्व तलावांचे संरक्षण,शुद्ध हवेसाठी झिरो डस्ट पॉलिसी,कम्युनिटी को-वर्किंग स्पेस तसेच आधुनिक एआय कम्युनिटी को-वर्किंग स्पेस, डिजिटल कामांना चालना या आश्वासक मुद्द्यांचा समावेश आहे

नागपूरमध्ये पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 32 सदस्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिस्त आणि पक्षनिष्ठा त्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तरीही जे कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करत आहेत किंवा निवडणूक लढत आहेत अशा भाजपच्या सदस्यांना सहा वर्षांसाठी शिस्तभंग व पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून नागपुरामध्ये 32 सदस्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
यात प्रभाग 1: सुनिता महल्ले, प्रभाग 2: देवराज वासनिक, प्रभाग 3: नासिमाबानो, प्रभाग 4:सचिन खो ब्रागडे, प्रभाग 5: महेंद्र गुप्ता व पुष्पा किरपाने, प्रभाग 9: रूणाल चौहान, प्रभाग 14: सुनील अग्रवाल, प्रभाग 17:विनायक डेहनकर, प्रभाग 18: धीरज चव्हाण व अक्षय ठवकर, प्रभाग 19: प्रकाश घाटे व पापा यादव, प्रभाग 20:विशाल लारोकर, प्रभाग 21: शुभम मौदेकर, सुलोचना कोवे व राकेश भनारकर, प्रभाग 22: रविशंकर कुंभारे, दशरथ मस्के, आशिष भुते व नंदिनी भुते, प्रभाग 24 टेकचंद सोनबोईर, नंदू अहिर, रेणु गेंडरे, शुभम पडोळे व राजू घोसे, प्रभास 26: सुनील मानापुरे, प्रभाग 31:सोनाली घोडमारे, प्रभाग 32:दीपक चौधरी, प्रभाग ३४:आसावरी कोठीवान व सुनील मानेकर यांचा समावेश आहे.
निलंबनाबाबत अधिक माहिती देताना भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा आदेश अंतिम असतो. जो कोणी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे काम करणार नाही किंवा पक्षाच्या विरोधात छुपी खेळी करेल त्याची गय केली जाणार नाही. या निलंबनानंतर सदर व्यक्तीचा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यक्रमाशी, किंवा मोहिमेशी संबंध राहणार नाही.

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्या घर व कार्यालयावर ईडीची धाड
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठाकरे शिवसेना गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर व कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 2021 मधील रेती तस्करी आणि बेकायदेशीर रेती विक्री प्रकरणासंबंधीत कारवाई म्हणून नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटण सावंगी परिसरात घडीची जोरदार छापेमारी सुरू आहे. सावनेर मध्ये प्रफुल्ल कापसे, उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते तर पाटणसावंगी येथे शरद राय, मनोज गायकवाड यांच्या घर व कार्यालयावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.
भाजपने 26 बंडखोरांवर केली सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई
मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपने शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गट यांना सोबत घेतले आहे. या युतीमुळे भाजपला मित्र पक्षांना जागा सोडाव्या लागल्या. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्या भाजपच्या इच्छुकांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहे. भाजप नेत्यांनी त्यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्यासाठी केलेली पक्षाची विनंती या उमेदवारांनी धुडकावून लावली आहे. त्यामुळे भाजपने कारवाईचा बडगा उचलत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या 26 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या या बंडखोरांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे
इतिहासातील सर्वात मोठ्या प्रभावाचे धनी ठरतील राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील अशी भविष्यवाणी केली आहे. ते म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र आले असले तरी त्यांच्या युतीला राजकीय दृष्टी काहीही अर्थ नाही. 2009 ला ते एकत्र आले असते तर त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळाला असता पण आता त्यांच्यामध्ये मतदारांची ताकद नाही.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *