भिवापूर ( राजेश जांभूळे )मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने भिवापूर तालुका सर्वदूर मिरची साठी ओळखला जातो. मात्र यावर्षी परस्थिती वेगळी दिसून येत आहे. येथील स्थानिक मार्केट मध्ये ओला( डोडा) येण्याचे प्रमाण खुप च अत्यल्प आहे. शेतकरी वर्ग हिरवी मिरची व्यापाऱ्याला थेट बांधावर विकत असल्याने यंदा ओला (डोडा) सातऱ्यावर अत्यल्प प्रमाणात पहावयास मिळत आहे.
एक महिन्यापासून ओला ( डोडा) मिरचीच्या मार्केटला प्रारंभ झाला. या मिरचीच्या आठवडी बाजारात ओला (डोडा) मिरचीची आवक अत्यल्प पहावयास मिळाली.
या ओल्या मिरचीला फक्त २५ रुपये किलो प्रमाणे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा चांगला हिरमोड झाला असल्याने हे शेतकरी वर्ग हिरव्या मिरची विकण्या कडे वळले आहे. त्यांना व्यापारी बांधावर ३५ रुपये असा चांगला भाव देत आहे. .त्यामुळे शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात हिरव्या मिरचीचा तोडा करीत आहे. त्यामुळे ओला डोडा मिरची मार्केटमध्ये येण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वाळल्या मिरचीचे भाव यंदा वाढू शकते असे मिरचीचे कमीशन एजन्ट शफी शेख यांनी व्यक्त केली आहे.
प्रतिक्रिया – शफी शेख
मिरची कमिशन एजन्ट, भिवापूर
दरवर्षी आम्ही ओला (डोडा) मिरची ची मार्केट यार्ड मधून खरेदी करून मिरचीच्या सातऱ्यावर या मिरचीला वाळवून मिरचीची आलटापालट करून त्यातील चरकी महिला मजुराच्या हाताने काढण्यात येते. नंतर हा माल मिरचीची पावडर करण्यासाठी कंपनीला पाठविण्यात येते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी मिरचीच्या ओल्या डोडा वाळवण करण्यासाठी सातऱ्यासाठी करीता रिकामी जागा लीजवर घेतली आहे. परंतू .मार्केट यार्ड मध्ये ओल्या डोड्या ची आवक गेल्या वर्षीचा तुलनेत अत्यल्प असल्याने त्यांनी सांगून यावेळेत वाळल्या मिरचीचे रेट वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया – रामकृष्ण गोगल सचिव
तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, भिवापूर
ओल्या डोडा मिरचीचे फक्त दोन मार्केट झाले असून फक्त एकूण १० क्विंटल इतकीच आवक झाली. असून २५०० क्विंटल रुपये असा दर आहे. शेतकरी वर्ग हिरव्या मिरचीचा तोडा मोठ्या प्रमाणात करीत असल्याने हा ओला मिरचीचा ( डोडा) मार्केट मध्ये कमी येत असल्याचे दिसून येत आहे.





