टॉप स्टोरी महाराष्ट्र

दळणवळणातून औद्योगिकीकरणाची नवी इकोसिस्टिम

देवेंद्र फडणवीस यांनी दिले सोलापूर शहराच्या विकासाचे आश्वासन

जिथे विमानसेवा होऊ शकते ही कल्पनेपलीकडची गोष्ट होती तिथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीतून विमानतळच उभे राहिलेलले नाही तर येथे नाइट लँडिंग सुरू करण्यावरही आम्ही भर देणार आहोत. येथे वंदे भारत ट्रेन सोबतच नाशिक, सोलापूर अक्कलकोट हा महामार्ग सुरू करून सोलापूर शहर जगातील दहा बंदरांपैकी एक असलेल्या वाढवण बंदराशी जोडल्या जात आहे. बंदराच्या माध्यमातून होणारा विकास गावोगावी पोहोचावा म्हणून रस्त्यांचे जाळे विणल्या जात आहे. या दळणवळणाच्या साधनातून औद्योगिक इकोसिस्टीम उभी करून सोलापूर उद्योग नगरी लवकरच भरभराटीला येईल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या प्रचार सभेत व्यक्त केला.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा सोलापूर येथे आयोजित केली होती. या प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, स्वाभिमानी लोकांची ही नगरी तेथील हातमाग, यंत्रमाग, विणकर, बिडी कामगार, शेती यांच्यासाठी ओळखली जाते. पण या शहराला आधुनिक शहराची ओळख देखील मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.या अनुषंगाने ते म्हणाले की, अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यासाठी खेड्यातील माणूस हा शहरात येत असतो.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि शहरीकरणामुळे झोपडपट्ट्या, पिण्याच्या पाण्याची अनास्था, घनकचरा, सांडपाणी, रोगराई अशा समस्या उद्भवतात. तेव्हा शहरातील सामान्य गरीब मध्यमवर्ग याच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायचे असेल तर शहराचा विकास झाला पाहिजे. गेल्या 70 वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या शहरांच्या नियोजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी, अमृत शहर योजना, स्वच्छ भारत शहरी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी योजना यांच्या माध्यमातून कोटींचा निधी शहरांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आणि यातूनच महाराष्ट्रातील शहरांचा विकास साधल्या जात आहे.

सोलापूर शहरातील उद्योगांना नवीन उभारी मिळावी आणि जगातील उद्योग येथे पोहोचावे म्हणून येथे विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. विमानसेवा हे श्रीमंतांचे लक्षण नसून सामान्य माणसाच्या विकासाची आणि त्याच्या भरभराटीचे साधन आहे. आणि हीच दूरदृष्टी ठेवत नाशिक, सोलापूर, अक्कलकोट हा महामार्ग सुरू करून हे शहर जगातील 10 बंदरांपैकी एक असलेल्या वाढवण बंदराला जोडल्या जात आहे. या बंदराच्या माध्यमातून होणारा विकास गावोगावी पोहोचावा म्हणून रस्त्यांचे जाळे विणून इकोसिस्टम उभी केली जाणार आहे. यातून सोलापूर शहराची औद्योगिक औद्योगिक भरभराट होणार आहे. हा विकास पाहिजे असेल तर आमच्या हातात सत्ता द्या असे त्यांनी सोलापूरकरांना आवाहन केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *