टॉप स्टोरी महाराष्ट्र

मुंबईमध्ये जनमताचा कौल भाजप शिवसेना युतीला

अनेक संस्था माध्यमांच्या सर्वेक्षणावरून निदर्शनास आलेले जनमत
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या निकालापूर्वी अनेक माध्यम संस्थांच्या सर्वेक्षणानुसार घेण्यात आलेल्या जनमताच्या कौलानुसार मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे शिवसेना युतीच्या हातात एक हाती सत्ता जाणार असल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे.

घेण्यात आलेल्या जनमताच्या कौलानुसार मुंबईमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवल्या जात आहे. ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा तर इतर पक्षांना 7 जागा मिळू शकतात असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. मुंबईमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत असल्याने या पक्षाला किती जागा मिळणार याचे आकडे समोर आलेले नाही.

या अंदाजावरून तब्बल 25 वर्षे ज्या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती त्यात सत्तांतर होऊन भाजप शिंदे युतीचाच महापौर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2017 मध्ये ठाकरे गटाला 84 तर भाजपाला 82 जागा मिळालेल्या होत्या पण यंदा चित्र पालटलं असून भाजप शिवसेना युतीला 138 जागा मिळून पूर्ण बहुमत मिळणार असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मुंबईची अस्मिता मराठी माणूस या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी निवडणूक प्रचार केला होता तर भाजपाने विकासाच्या मुद्द्यावर प्रचाराचा गड लढविला होता. पण जनतेने विकासाला कौल दिल्याचे या जनमताच्या कौलावरून दिसत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *