टॉप स्टोरी महाराष्ट्र राजकारण

सगळेच राजकीय पक्ष आपल्या नगरसेवकांना खात्यात जमा करणार:आतापासूनच हॉटेल डिप्लोमसीची सुरुवात

गजानन तुपे,मुंबई:29 महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची महानगर पालिका मुंबईची आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात संमिश्र पद्धतीचा कल येऊ शकतो. मुंबईमध्ये जवळपास त्रिशंकू किंवा त्यापेक्षा वेगळा कल येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोष्टी सर्वच राजकीय पक्षांच्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळेच आतापासूनच आपापले नगरसेवक आपल्या जवळच्या खात्यामध्ये जमा करून त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जाऊन हॉटेल डिप्लोमसी करण्याची तयारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे.

मुंबई महानगरपालिकेची सत्ता बळकावण्यासाठी उद्याच्या दिवशी मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता गृहीत धरून सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले नगरसेवक आपल्या खात्यात जमा करून त्यांना अज्ञात स्थळी नेण्याचे ठरवले‌ आहे, असे अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर थेट मंत्रालय ते गुवाहाटी व्हाया सुरत झालेली घटना पाहता सर्वच पक्षांनी याबाबत खबरदारी घेतलेली दिसते. याबाबतचे आदेश सर्वच पक्षांनी आपापल्या नगरसेवकांसाठी काढलेले असून उद्या सकाळी किंवा पहाटेपूर्वी सर्वच नगरसेवक अज्ञातस्थळी असल्याचे दिसून येईल, असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *