राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान झाले आणि त्याचे निकाल लागले. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत अजून व्हायची असल्यामुळे महापौर निवडणुकीआधी पक्षांचे आमदार फुटण्याची भीती पक्षांना लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्व पक्ष आपल्या आमदारांना सांभाळून आहेत.सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा 89 जागा मिळवीत सर्वात मोठा पहिला नंबर चा पक्ष ठरला आहे.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने 65 जागा मिळत दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा मिळवील्या आहेत. भाजप पक्षाला महापौर पदासाठी बहुमत न मिळाल्याने एकनाथ शिंदे गटाला सोबत घेण्यात पर्याय नाही. एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यावर चोराच्या मनात चांदणे अशा प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे बाबत केल्या जात आहेत.
उद्धव ठाकरे यांनी असे वक्तव्य केले की देवाच्या मनात असेल तर आमच्या पक्षाचा महापौर होऊ शकतो.
ठाकरेंकडे हुकूमाचे एक्के
महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसले तरी सध्याच्या घडीला ठाकरेंकडे दोन हुकूमाचे एक्के असल्याचं चित्र आहे. कारण निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात ST साठी राखीव आहेत. प्रभाग 53 आणि प्रभाग 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन मतदारसंघात सर्वपक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. अशा परिस्थितीत जर 22 जानेवारीला महापौरपदासाठी जी आरक्षण सोडत निघणार आहे, त्यावेळी महापौरपद जर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं तर ठाकरेंना लॉटरी लागू शकते.





