महाराष्ट्र

भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा

भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक झाली. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केला आहे. दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले.

महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरुद्ध उभी होती. भिवंडी मध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. भिवंडी महापालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक एक मध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणेच्या कारभारावर विलास पाटील यांनी बोट ठेवले आहे.

दुसरीकडे महेश चौगुले यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात जमले त्यामुळे झालेल्या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आणि त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *