चंद्रपूर महापालिकेतील गटनेता निवडीवरून काँग्रेस मधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. आमदार विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा पाटील यांच्यातील संघर्ष टीकेला गेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या वादावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली की आमच्यात कोणतेही वैयक्तिक व राजकीय भांडण नाही.खासदार धानोरकर यांचा गैरसमज झाला आहे त्यामुळे ही वक्तव्ये समोर आली आहे.
आमदार विजय वडेट्टीवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर तोफ डागली की, खासदार झालो म्हणून आपण मालक ठरत नाही. थोडा संयम ठेवून काम करावे लागते. माझ्या उमेदवारीला विरोध केले होते किंवा वैचारिक मतभेद असले म्हणून तिकीट कापणे आणि उमेदवाराला बाजूला सारणे चुकीचे आहे. जुना इतिहास उगाळला तर बाळू धानोरकर यांना पक्षात मिच आणले होते आणि त्यांचा पक्ष प्रवेश झाला. प्रतिभा झाल्यानंतर यांना येऊन केवळ सहा वर्ष झाले त्यामुळे मीच मालक आहे असे म्हणणे चुकीचे आहे. मागील 25 वर्षांपासून मी पक्ष सांभाळत आहे. ज्या जुन्या कार्यकर्त्यांनी पक्ष सांभाळला, काम केलं अशांना बाजूला सारणं योग्य नाही.
फितूर घटकांमुळे काँग्रेसमध्ये गटबाजी, प्रतिभा धानोरकर
काँग्रेस पक्षात भाजपसाठी काम करणारी बी टीम सक्रिय असून अशा फितूर घटकांमुळेच पक्षात गटबाची निर्माण होत आहे. असा आरोप करीत खासदार धानोरकर यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर आरोप करीत निशाणा साधला आहे. सुधीर मनगंटीवार जर म्हनत असतील की काँग्रेसमधील एक गट आमच्या संपर्कात आहे तर त्यामध्ये काहीतरी तथ्य नक्कीच असेल. समोर त्या म्हणाल्या की कोणीही माझ्या पक्षामध्ये हस्तक्षेप करू नये.
दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली की, आमच्यात कोणताही राजकीय वा वैयक्तिक वाद नाही. धानोरकर यांना गैरसमज झाला असल्याने हे वक्तव्य समोर येत आहे.




