अकोला

बहुचर्चित किसनराव हूंडीवाले प्रकरणात दहा आरोपींना जन्मठेप

अकोल्यातील प्रॉपर्टी व्यवसायिक किसनराव हुंडिवाले हत्या प्रकरणाचा आज जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तिवाद पार पडला. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज (21 जानेवारी) जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तीवाद पार पडला. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 मे 2019 रोजी पोलीस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याबाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती.

हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता. यामध्ये पती आणि निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा तत्कालिन प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजीत गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपुत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे यांचा समावेश आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. फारसे पुरावे नसल्यामुळे पाच जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *