“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत दि.३१.१२.२०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे. तथापि, सदर प्रक्रिया पूर्ण करताना “लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/ उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे.
अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन e-KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दि.३१.०३.२०२६ पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सधारण करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात येत आहे




