टॉप स्टोरी नागपूर विदर्भ

नागपुरात महानगरपालिकेत भाजपाच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

महापौर पदी नीता ठाकरे तर उपमहापौर पदी लिला हाथीबेड
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळाले आहे. भाजपाच्या नीता ठाकरे यांची महापौरपदी, तर लीला हाथीबेड यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली.
महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या मतदानात नीता ठाकरे व लीला हाथीबेड यांना प्रत्येकी १०४ मते मिळाली. काँग्रेसकडून महापौरपदासाठी स्नेहल ठाकरे, तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे हे उमेदवार रिंगणात होते. मात्र त्यांना प्रत्येकी ३६ मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत एमआयएमचे ६, मुस्लिम लीगचे ४ बसपाच्या एका सदस्याने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांचा विजय सुकर झाला.

सोलापूर, धुळे, पिंपरी चिंचवड येथे भाजपची एकसत्ता

आज झालेल्या आठ शहरातील महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून सोलापूर, धुळे, पिंपरी चिंचवड येथे भाजपाने एक हाती सत्ता राखली आहे.
सोलापूर मध्ये भाजपचे विनायक कोंड्याला हे तर ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर झालेल्या आहेत.
धुळे मध्ये भाजपाच्या मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदी ज्योत्स्ना पाटील विराजित झाले आहेत. पिंपरी चिंचवड येथे रवी लांडगे हे महापौरपदी तर शर्मिला बाबर या उपमहापौर पदी निवडून आलेले आहेत. जळगाव येथे भाजप शिवसेनेची युती आली असून महापौर पदी भाजपच्या दीपमाला काळे, उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी निवडून आलेले आहेत. अहिल्यानगर येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली असून ज्योती गाडे या महापौर पदी तर उपमहापौर पदी धनंजय जाधव निवडून आले आहेत. नाशिक येथे महापौर पदी भाजपच्या हिमगौरी आहेर आडके व उपमहापौर पदी शिवसेना शिंदेचे विलास शिंदे निवडून आलेले आहेत

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *