*’व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखालील पाश्चात्य विकृती आणि ड्रग्ज संस्कृती रोखा;अकोला येथे हिंदू जनजागृती समितीसह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!*
*जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदने देऊन ठोस कारवाईची मागणी; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ तैनात करण्याची विनंती*
*अकोला (प्रतिनिधी)*:
येत्या १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शहरात फोफावणारा पाश्चात्य चंगळवाद, अमली पदार्थांचा वाढता वापर आणि महिलांची होणारी छेडछाड या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अकोला येथे हिंदू जनजागृती समिती आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रशासनाला ‘जाग’ करण्यात आले. बुधवारी (११ फेब्रुवारी २०२६) जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला सविस्तर निवेदने देऊन, या दिवशी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
१. *प्रशासनाकडे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘ड्रग्ज’ विरोधात मागणी*:
अकोला येथील उपजिल्हाधिकारी श्री गजेंद्र मालठाणे यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रामुख्याने नमूद करण्यात आले की, व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली आयोजित खाजगी पार्ट्यांमध्ये मद्य आणि अमली पदार्थांचा (Drugs) सर्रास वापर होतो. तसेच, हिंदू तरुणींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे. शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिन’ साजरा करण्यासाठी प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होतील, अशी महत्त्वपूर्ण मागणीही यावेळी करण्यात आली.
२. *पोलीस प्रशासनाकडे ‘दामिनी पथक’ आणि कडक गस्तीची मागणी*:
अकोला पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली की, १४ फेब्रुवारी रोजी महाविद्यालय परिसर, उद्याने आणि पर्यटन स्थळांवर साध्या वेशातील पोलीस तसेच ‘दामिनी आणि निर्भया पथके’ तैनात करावीत. तसेच, सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करत वेगाने गाड्या चालवणाऱ्या हुल्लडबाजांवर वाहतूक शाखेने कठोर कारवाई करावी आणि महिलांच्या सुरक्षिततेची दक्षता घ्यावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
*राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती*
हे निवेदन देताना हिंदू जनजागृती समितीचे श्री.अमोल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली अकोला अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते.
यामध्ये प्रामुख्याने:
अकोला येथील श्री निकेश जी गुप्ता ( विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे अध्यक्ष. ) श्री योगेश अग्रवाल, श्री उदय महा, श्री अमोल पारीस, श्री नंदकिशोर मेहेरे,श्री प्रमोद अग्निहोत्री, श्री अजय खोत, श्री गिरीश कुलकर्णी, सौं.अश्विनी सरोदे, श्री संजय निमखंडे, श्री सुनील पाटील, श्री प्रशांत पाटील, आधी धर्मप्रेमी उपस्थित होते.
यावेळी “शहरातील शांतता आणि भारतीय संस्कृतीचे पावित्र्य जपण्यासाठी प्रशासन आणि समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे,” असा सूर धर्मप्रेमींनी व्यक्त केला. स्थानिक प्रशासनाने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, नागरिकांनीही या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




