अकोला

अकोला : ‘शितादई’नं विद्यापीठात वऱ्हाडीचा दरारा वाढवला

काळ्या मातीतलं पांढरं सोनं आता बी.ए.च्या पुस्तकात; प्राध्यापक वृषाली विजय देवकर यांच्या कवितेला शैक्षणिक मान
प्रतिनिधी संतोष माने :-अकोला : “काया मातीत उगलं, कास्तकाराचं धन…” असं म्हणत वऱ्हाडच्या मातीचा सुगंध शब्दांत साठवणारी ‘शितादई’ कविता आता थेट विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात झळकनार हाय. नं बी.ए. दुसरं वर्ष, चौथं सत्र या अभ्यासात या कवितेचा समावेश केला.

ही कविता प्राध्यापक वृषाली विजय देवकर यांची. पातूरची लेक आन् सध्या परतवाड्यात वास्तव्यास असलेल्या देवकर मॅडम सध्या अचलपूरच्या स्व. छगनलाल मुलजीभाई कढी महाविद्यालयात कार्यरत हाय. शिकवणं आन् लिखाण—दोन्ही हातात हात घालून त्यांनी जपलं.

‘शितादई’तून पश्चिम विदर्भातला शेतकरी, काळी माती, कापसाचं पांढरं सोनं आन् घामानं निथळणारं जगणं ठसक्यात उभं राहतं. बोलीतलं खरंखुरं आयुष्य त्यांनी जसं अनुभवलं, तसंच शब्दांत उतरवलं. म्हणूनच ही कविता केवळ ओळी नाय, तर वऱ्हाडच्या मातीचा जिवंत श्वास हाय.

विद्यापीठानं घेतलेला हा निर्णय म्हणजे वऱ्हाडी बोलीला मिळालेला मानाचा मुजरा म्हणावं लागंल. आता पोरांना पुस्तकातूनच गावाकडचं जगणं भेटनार, आन् बोलीचा अभिमान नव्यानं रुजणार. वऱ्हाडच्या शब्दांना मिळालेला हा शैक्षणिक सन्मान साहित्यवर्तुळात समाधानाची लाट घेऊन आला हाय.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *