अकोला

सखारामपूर येथे श्री. संत. सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा

अकोला :संग्रामपूर तालुक्यातील सखारामपूर येथे संत सखाराम महाराजांचा ७९ वा पुण्यतिथी सोहळा भक्तीमय व उत्साही वातावरणात मोठ्या जल्लोषात पार पडला. तीन दिवसाच्या यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारचा तमाशा आर्केस्ट्रा सिनेमा टॉकीज येथे आढळणार नाही या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तब्बल २००१ हून अधिक दिंड्यांचा सहभाग होता.

२२ तारखेला विविध भागांतून वारकरी आपल्या दिंड्या घेऊन सखारामपूर येथे दाखल झाले. २३ तारखेला मुख्य यात्रा उत्साहात पार पडली. तर २४ तारखेला काल्याच्या किर्तनानंतर वारकरी आपापल्या दिंड्यांसह आपल्या गावांकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

सखारामपूर संस्थानाला “वराळाची काशी” म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी बहुजन समाजातील वारकरी मोठ्या संख्येने एकत्र येत असून तीन दिवस विविध धार्मिक, सांप्रदायिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संत सखाराम महाराजांनी आपल्या कीर्तनातून व आध्यात्मिक विचारांतून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सखारामपूर येथे हरीनामाचा भव्य सोहळा अनुभवायला मिळतो.

या संस्थानाची गादी सांभाळणारे गुरुवर्य ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानाचा कारभार मोठ्या प्रमाणात विस्तारला आहे. तसेच अनेक वर्षांपासून होत असलेल्या या यात्रा महोत्सवासाठी गुरुवर्य गोपाळ महाराज व गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. २४ तारखेला गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने यात्रा महोत्सवाची सांगता झाली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *