नागपूर मौदा

व्यसनमुक्तीचा ‘विदर्भ पॅटर्न’; उद्ध्वस्त कुटुंबांना नवे जीवन

सरकारला जे जमले नाही, ते ‘परमात्मा एक’ने करून दाखवले

मौदा: जिथे सरकारी व्यसनमुक्ती केंद्रे अपयशी ठरत आहेत आणि दारूबंदीचे कायदे केवळ कागदावर उरले आहेत, तिथे ग्रामीण भागात एक शांत पण प्रभावी सामाजिक परिवर्तन घडत आहे. ‘परमात्मा एक सेवक मंडळ’ आणि मानव धर्माचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी बाबा जुमदेवजी यांच्या भक्तीमार्गातून विदर्भातील शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी समाजातील हजारो लोक दारूच्या विळख्यातून बाहेर पडत आहे

मौदा येथे आश्रम व वर्धमान नगर, नागपूर येथे मंडळ भवन स्थापन करून चार तत्व, तीन शब्द व पाच नियमांद्वारे एका परमेश्वराचा परिचय दिला जातो. ही केवळ धार्मिक चळवळ नसून विस्कळीत संसार पुन्हा उभे करणारी एक जीवनशैली ठरत आहे.

दारिद्र्य व शिक्षणाअभावी व्यसनाधीन झालेल्या तरुणांना भगवान हनुमान पूजा व अविश्रांत भक्ती या सूत्रांच्या आधारे जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. कोणत्याही महागड्या उपचारांशिवाय, केवळ शिस्त व श्रद्धेच्या जोरावर ही व्यसनमुक्ती साध्य होत

आहे. या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अवैध दारू व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेक गावांत सामूहिक दारूत्याग झाल्याने काही गावे शंभर टक्के दारूमुक्त झाली आहेत. दारूवरील खर्च आता मुलांचे शिक्षण व घरगुती प्रगतीसाठी वापरला जात आहे.

‘व्यसनमुक्ती केंद्रात हजारो रुपये खर्च करूनही फरक पडला नव्हता, पण सेवक संघात सामील झाल्यापासून आमच्या घरात पुन्हा लक्ष्मी नांदू लागली,’ असे एका स्थानिक सेवकाने सांगितले.

या उपक्रमात कष्टकरी वर्गासह नोकरदार व व्यावसायिक वर्गाचाही सहभाग वाढत आहे. दर महिन्याला
साप्ताहिक बैठकींतून मानवी मूल्यांची शिकवण दिली जाते. दानशूर नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. होणारे ‘पांढरवाडा’ कार्यक्रम व

दारू सुटल्याने घरातील वातावरण बदलले असून, नवी पिढी शिक्षणाकडे वळत आहे. शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे हा समाज मुख्य प्रवाहात सन्मानाने उभा राहत आहे.

‘परमात्मा एक सेवक मंडळ’ आज सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी मॉडेल ठरत असून, सेवा आणि भक्तीच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे नेणारी नवी वाट निर्माण करत आहे

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *