नागपूर मौदा

भाविकांची वारी, धानला येथे शंकराच्या दारी !

स्मशान भूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, भाविकांनी रांगा लावून घेतले भोळ्या शंकराचे दर्शन

मौदा प्रतिनिधी: महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखो भाविकांनी तालुक्यातील धानला येथील स्मशानभूमीत शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. स्मशान भूमी सह गावातील भक्तांच्या गर्दीने सर्वच ठिकाणची शिवालये फुलून गेली होती. परिसरातील पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अर्चना, अभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात सर्वत्र यात्रा आणि उत्साहाचे वातावरण होते,
धानला येथे आयोजित महाशिवरात्रीनिमित्त स्मशान भूमीत भाविकांची गर्दी उसळली, भाविक भक्तांनी भोळ्या शिव शंकराचे दर्शन घेतले. हर हर महादेवच्या गजरात भाविकांच्या पाऊलखुणा धानला येथील स्मशान भूमिच्या दिशेने चालले होते. उपस्थित माजी आमदार टेकचंद सावरकर, मौदा येथील नगराध्यक्ष प्रसन्ना राजाभाऊ तिडके, सरपंच ज्योती सावरकर, उपसरपंच अजय हारोडे, निशा सावरकर, मंगेश ठोंबरे, सूर्यकांत रोडे, व ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,

शिवभक्तांनी घेतला महाप्रसादाचा आस्वाद
मौदा तालुक्यातील धानला येथील सुसज्ज स्मशान भूमीत निसर्गरम्य परिसरात गर्द हिरव्या गार परिसरात व शिवभक्तांनी अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून पूजा केली. ग्रामपंचायत च्या वतीने व पदाधिकाऱ्यांनी भाविक भक्ताकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. परिसरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

भाविकांसाठी महाप्रसाद व पाण्याची सुविधा
याठिकाणी भाविकांना कुठलीही असुविधा होऊ नये. यासाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येत होते. यात उपवास असलेल्यांसाठी उपवासाची खिचडी तर इतरांसाठी मसाला भात व ताकचे वितरण करण्यात आले. याशिवाय शुद्ध पिण्याचे थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते. विविध ठिकाणी व यात्रेच्या निमित्ताने येथे येथे असंख्य दुकाने लागली होती. यात पूजेला लागणाऱ्या साहित्यांची दुकानांची भरमार होती. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढालही झाली. खाद्यपदार्थांसह मुलांच्या खेळणीची दुकानेही सजली होती.
तालुक्यात भरलेल्या यात्रेत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *