नवी मुंबई

वायू प्रदूषण रोखण्यासाठी दोन विकासकांवर कारवाई

नवी मुंबई:वायू प्रदूषण प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबताना महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रातील बांधकाम साईट्सवर मानक कार्यप्रणालीनुसार कार्यवाही होत असल्याबद्दल काटेकोर पाहणी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तुर्भे विभागातील 7 बांधकाम साईट्सवरील काम बंद करण्यात आले आहे.
अशाच प्रकारे घणसोली विभाग कार्यक्षेत्रामध्ये सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वायू व ध्वनी प्रदूषणाबाबतच्या मानक कार्यप्रणालीतील नियमांची अंमलबजावणी न केल्यामुळे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त -2 डॉ राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, परिमंडळ -२ उपायुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सेक्टर 3 घणसोली येथील भूखंड क्र. 24 व 25 या ठिकाणची गामी अँड कृष्णा इंटरप्राईजेस ही मालमत्ता सील केलेली आहे तसेच भूखंड क्र. 26, सेक्टर 3 येथील लाल केबी इन्फ्रा प्रा.लिमी. या विकासकाचे बांधकाम बंद करण्यात आलेले आहे.
घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे यांच्या नियंत्रणाखाली, कार्यकारी अभियंता यशवंत कापसे, उप अभियंता रमेश गुरव, उप अभियंता किरण पाटील तसेच कनिष्ठ अभियंता, स्वच्छता अधिकारी, उद्यान सहाय्यक यांनी ही कारवाई केली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *