नवी मुंबई

सारसोळे जेट्टी परिसरात प्रभावी स्वच्छता मोहीम

नवी मुंबई:स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली असून सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिका आणि एन्व्हायरमेंट लाइफ फाऊंडेशन, मॅनग्रुव्हज सोल्जर या संस्थांच्या व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने पाम बीच रस्त्यानजिक सारसोळे जेट्टीलगत असलेल्या खाडीकिनारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, परिमंडळ १ उपआयुक्त सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त. प्रशांत नेरकर, नेरूळ विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या नियंत्रणाखाली उपमुख्य स्वच्छता अधिकारी नरेश अंधेर, स्वच्छता अधिकारी अरुण पाटील यांनी आपले सहकारी स्वच्छता निरीक्षक विजय नाईक, नवनाथ ठोंबरे व उपस्वच्छता निरीक्षक यांच्यासह लोक सहभागातून ही मोहीम यशस्वीरीत्या राबवली.

सारसोळा जेट्टी लागत असलेल्या खाडीकिनारी उत्साहाने संपन्न झालेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेत एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मेश बराई, मँग्रोज सोल्जरचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत कर्मवीर भाऊराव पाटील मॉडर्न कॉलेज वाशी, एसआयईएस कॉलेज नेरूळ, एस के कॉलेज नेरूळ, एमजीएम कॉलेज कळंबोली, सरस्वती कॉलेज खारघर, रामशेठ ठाकूर कॉलेज पनवेल, ए सी पाटील कॉलेज पनवेल, जनार्दन भगत शिक्षण संस्था कॉलेज पनवेल या प्रतिथयश महाविद्यालयांतील २०० हून अधिक एनएसएसचे विद्यार्थी व स्वच्छतादूत सक्रिय सहभागी होते. यावेळी २५० हून अधिक गोणी प्लास्टिक बॉटल, थर्माकोल असा कचरा काढून घेण्यात आला. यावेळी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *