क्रीडा टॉप स्टोरी

पाकिस्तानची अक्कल ठिकाणावर रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान

नवी दिल्ली दि. १० वृत्तसंस्था,भारताबरोबर सामना खेळणार नाही असा बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानची अक्कल आता ठिकाणावर आलेली आहे. टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधील भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही असे सांगून बहिष्कार टाकणाऱ्या पाकिस्तानने अखेर यु टर्न घेतला आहे. आयसीसी ने ताकीद दिलेली दंडात्मक कारवाई आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वरती त्याचे भविष्यात होणारे परिणाम यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड सुतासारखे सरळ आले आहे. आठवडाभरांच्या वाटाघाटी नंतर अखेर रविवारी, 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेट शौकिनांना ही ‘हायव्होल्टेज लढत’ रविवारी अनुभवायला मिळणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *