मुरबाड

काळू धरणाच्या भूसंपादनासाठी हालचालींना वेग; धरण क्षेत्रातील जमिनीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

मुरबाड, दि.१०,प्रतिनिधी,काळू धरण होण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून धरणक्षेत्र भागांची पाहणी करण्यात आली आहे. याअगोदर ग्रामस्थांनी काळू धरण न होण्यासाठी विरोध दर्शवला होता. याबाबत विविध संघटनांकडून आंदोलने ही करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी चार दिवसांपूर्वी प्रस्तावित काळुधरणाची जागा आणि विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी याबाबत स्थळ पाहाणी केली आहे.
मुरबाड तालुक्यातील प्रस्थावित काळू धरण होण्याबाबत हालचाली सुरु झालेल्या आहेत. काळू धरणाच्या उभारणीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी हे धरण होणे महत्त्वाचे आहे. या दराने उभारणीसाठी ९९ हेक्टर वन विभागाची जमीन १२६० हेक्टर खाजगी जमिनीची आवश्यकता आहे. जमिनींचे भूसंपादन कशाप्रकारे होते, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत.
आंदोलनांचा तपशील
काळू धरण उभारण्याच्या कामासाठी स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये ठराव पास करून विरोध केला आहे.काळू धरण प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मुरबाड तालुक्यातील धरणग्रस्त गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, आदिवासी बांधव आणि विविध सामाजिक संघटनांनी गेल्या काही वर्षांत सातत्याने आंदोलने केली आहेत. धरणामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीजमीन, घरे, वनक्षेत्र तसेच उपजीविकेची साधने पाण्याखाली जाणार असल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे.काळू धरण प्रकल्पाला विरोध करत सामाजिक कार्यकर्त्या इंदवी तुळपुळे यांनी प्रशासनाच्या हालचालींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ग्रामसभा वेळापत्रक(येथे ग्रामसभा होणार)
२५ फेब्रुवारी रोजी करचोंडे (कुडशेत) आणि जडई,
२६ फेब्रुवारी रोजी भोरांडे (फांगणे) आणि दिवाणपाडा,
२७ फेब्रुवारी रोजी भोरांडे आणि उदळडोह,
२ मार्च रोजी तळेगाव आणि तळेगाव (खरशेत उमरोली),
४ मार्च रोजी फांगुळगव्हाण आणि माळ,
५ मार्च रोजी दिघेफळ आणि वैशाखरे,
६ मार्च रोजी फांगळोशी,
९ मार्च रोजी न्याहाडी आणि खुटल बारागाव,
१० मार्च रोजी मोरोश आणि झाडघर,
११ मार्च रोजी चासोळे आणि आंबिवली येथे ग्रामसभा होणार आहेत.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *