उल्हासनगर , दि . ११ प्रतिनिधी : ऑनलाईन अर्ज भरताना नागरिकांना तांत्रिक अडचणी येत आहेत .ही समस्या लक्षात घेऊन उल्हासनगर येथील नगरभुमापन कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांना तातडीने सहकार्य मिळण्यासाठी “विशेष मदत कक्ष” स्थापन करण्यात आला असल्याची माहिती उल्हासनगरचे नगरभुमापन अधिकारी राजेंद्र रघुनाथ लोंढे यांनी दिली आहे .
नगरभुमापन अधिकारी राजेंद्र रघुनाथ लोंढे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,जमीन मोजण्याचे अर्ज आता जुन्या आँफलाईन पध्दतीने स्विकारले जाणार नाहीत.सर्व प्रक्रिया दिलेल्या अधिकृत लिंकद्वारे आँनलाईनच पुर्ण करावी लागणार आहे. मोजणी अर्ज दाखल करताना जमिनीचा सातबारा किंवा मालमत्ता पत्रक संबधित जमिनीचे जुने अभिलेख बिनशेती मोजणीसाठी मंजूर रेखांकन आराखडा, पोटहिस्सा मोजणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नियोजन प्राधिकरणाचे तात्पुरते मंजूर रेखांकन व ना हरकत दाखला,अर्जदारांचा ओळखीचा पूरावा मोजणी शुल्काचे आँनलाईन चलन (बँकेत भरुन त्याची प्रत) इत्यादी कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असल्याची माहिती नगरभुमापन अधिकारी राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे . यासाठी ई मोजणी व्हर्जन 2 मोजणी अर्जाबाबत शर्वरी पवार,अनिल माने, ई फेरफार/EPSIT फेरफार अर्जाबाबत गीता घोणे, जहाँगीरखान पठाण ,विशाल पोतदार ,जयंत पाटील यांच्याशी दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत संपर्क करावा.अशी माहिती नगरभुमापन अधिकारी लोंढे यांनी दिली आहे .




