तळमावले दि. १८ प्रतिनिधीशिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एका अवलिया चित्रकाराने अक्षरशः स्वतःचे रक्त वापरून महाराजांचे चित्र कागदावर रेखाटले आहे. त्यांनी केलेल्या या अनोख्या अभिवादनाचा प्रयत्न सध्या शिवप्रेमी मध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. सैदापूर (ता.कराड) येथील शेतीमित्र कलावंत संदीप डाकवे यांनी स्वःचे रक्ताने कुंचल्यातून चित्र रेखाटून आगळीवेगळी शिवजयंती साजरी करत आहेत. विशेष म्हणजे संदीप डाकवे शिवजयंतीदिवशी रक्तदान करणार आहेत.
स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणारे लाखो मावळे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजामाता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक, धर्मवीर छ.संभाजी महाराज यांच्या असीम त्याग, शौर्याला मुजरा करण्यासाठी शिवजयंतीदिनी शिवरायांचे रक्तातून चित्र रेखाटल्याचे संदीप डाकवे यांनी सांगितले आहे. रक्त शास्त्रशुद्ध पद्धतीने काढण्यासाठी तळमावले (ता.पाटण) येथील श्रीराम लॅबोरेटरी चे डॉ. सतीश जगताप यांचे विशेष सहकार्य मिळाले.




