बदलापूर

प्रभू श्रीराम यांच्याबद्दल तरुणीने आक्षेपार्ह विधान करून व्हिडीओ व्हायरल केला; प्रकरणी बदलापूर बंदची हाक,निदर्शने,तणाव

बदलापूर,दि.१,प्रतिनिधी:बदलापूर शहरातील एका तरुणीने सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आक्षेपार्ह विधान करून व्हिडीओ पोस्ट प्रसारित केली.त्यामुळे समस्त बांधवांच्या भावना दुखावल्या, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अनेक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ त्या तरुणीवर बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ -४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
बदलापूर येथे सोशल मीडियावर प्रभू श्रीराम आक्षेपार्ह व्हिडिओ एका तरुणीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हिडीओ कार चालवत असताना बनविला आणि स्टेटसवर टाकल्यानंतर तो त्वरित व्हायरल झाला, ज्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र निषेध केला आहे.
वारकरी संप्रदाय, विहींप आणि बजरंग दल अशा विविध संघटनांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि त्या तरुणीच्या विरोधात निषेध मोर्चे व आंदोलन सुरू झाले होते.स्थानिक ऑटो-रिक्शा संघटनांनी रिक्शा बंद करून बदलापूर बंदची हाक दिली.
प्रकरणी बदलापुर पोलीसांनी त्या तरुणीविरुद्ध अनुचित व्हिडीओ प्रसारित केल्याबद्दल संबंधित कायद्यांनुसार एफआयआर नोंदवली आणि तिला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *