मुंबई

प्रदीप म्हापसेकर यांचे आजपासून चित्र प्रदर्शन: “व्ह्यूजपेपर” – वर्तमानपत्राच्या ओळींच्या आडून

मुंबई दि. ३ प्रतिनिधी:प्रदीप म्हापसेकर एक व्यंगचित्रकार, लेखक, कवी, स्तंभलेखक आणि अमूर्त चित्रशैलीचे चित्रकार कलावंत. तुम्हाला ते वर्तमानपत्राच्या ओळींच्या मागून डोकावायला आमंत्रित करत आहेत.

जेव्हा वर्तमानपत्र हे कॅनव्हास बनते, तेव्हा अक्षरांच्या रेषा अमूर्त आकार धारण करतात. काही रेषा काळ्या- पांढऱ्या, तर काही लाल, पिवळ्या , काळ्या रंगांनी सजलेल्या काही ठिकाणी तर सोन्याची झळाळी अक्षरांतून चमकते.

तुमच्या रोजच्या वर्तमानपत्रावर इथे तुम्हाला रंग दिसणार. विविध आकार दिसणार. तुम्ही रोज जे पाहता, ऐकता,समजता ते तुमचेच असते. पण हे असेल इतरांपेक्षा वेगळे, खास. शीर्षकांपासून ते ओळींपर्यंत कथा पुढे सरकत राहते, फक्त न वाचलेल्या ओळींमध्ये थांबते. त्या थांबण्यातच श्वास घेण्याची जागा मिळते, आणि पुन्हा प्रवास सुरू होतो. तो ओळींच्या आडून.

प्रदीप म्हापसेकर यांची कला तुम्हाला जीवनातील सुख-दुःख अनुभवायला बोलावते. प्रत्येक रेषेतून, प्रत्येक रंगातून, प्रत्येक थांब्यातून जीवनाची नवी भाषा बोलते. कधी आनंदाची, कधी वेदनेची अनुभूती देते.

प्रदर्शन दि. बुधवार, ४ मार्च ते सोमवार, ९ मार्च, २०२६
सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:००
कलाकाराशी भेट / दररोज दुपारी २:०० ते संध्याकाळी ६:००
स्थळ- आर्टिस्ट्स सेंटर, तळमजला, आर्मी नेव्ही बिल्डिंग, फोर्ट, मुंबई – १
लँडमार्क – जहांगीर आर्ट गॅलरीसमोर, वेस्टसाइडच्या शेजारी
संपर्क : प्रदीप म्हापसेकर
९८२०८८६६७७

gajanantupe2@gmail.com

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *