माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची आंदोलनस्थळी भेट
रामटेक 🙁 प्रतिनिधी )देवलापार येथील अप्पर तहसील कार्यालय परीषरात वन्यजीव मानव संघर्षाविरोधातील सुरू असलेल्या आंदोलनाच्या सहावा दिवशी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी जंगलात मोठ्या प्रमाणावर कुरण क्षेत्र विकसित करण्याची गरज व्यक्त केली. शाकाहारी प्राण्यांना जंगलातच चारा उपलब्ध झाल्यास ते बाहेर येणार नाहीत व त्यावर अवलंबून असलेले वाघ व इतर मांसाहारी प्राणीही मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी रामटेक तालुक्यात घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचे स्वतंत्र मुख्यालय स्थापन करण्याची मागणी केली. सध्या प्रत्येक घटनेची माहिती जिल्हा स्तरावर पाठवावी लागत असल्याने स्थानिक अधिकाऱ्यांवर ताण येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जंगलालगत उभारण्यात येणाऱ्या संरक्षण भिंती दर्जेदार असाव्यात, केवळ औपचारिक नसाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलनात स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन माजी मंत्री राजेंद्र मुळक यांना सादर केले. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे प्रदेश अध्यक्ष तथा माजी जिल्हा परीषद सदस्य हरीष उईके, मुर्सेनाल नॅशनल गोंडवाना सोडूम संघटन चे मुकेश पेंदाम,माजी
जि.प.सदस्या शांताताई कुमरे, आ.इं.आ.ए.फे. सचिव विजय कोकोडे,
माजी समाज कल्याण सभापती दुर्गाताई सरियाम,खनोरा च्या सरपंच सरलाताई खंडाते,बांद्राच्या सरपंच कल्पना भलावी,वडांबा चे सरपंच मुकेश दुबे,माजी सभापती रवी कुमरे,ग्रा.प.सदस्य गजानन कुंभलकर, गजानन ढोरे, गुप्ता, मोतीराम खंडाते, संदीप इनवाते, किरण सलामे, गेंदलाल उईके,माजी सरपंच शेखर खंडाते, धर्मराज कोकोडे, मारोती मसराम, मोईन पठाण, आनंद वाडीवे, वाडीवे गुरुजी पत्रकार कैलास निघोट सह आदी उपस्थित होते.




