अंबरनाथ

अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील शाळा मंदिर परिसरात तबाखु जन्य पदार्थांवर बंदी

अंबरनाथ , दि . १८ प्रतिनिधी : अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील शाळा व मंदिरांच्या परिसरात विद्यार्थ्यांवर तसेच नागरिकांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांचा वाढता धोका लक्षात घेता, अशा विक्रीवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मा. नगराध्यक्ष सौ. तेजश्री करंजुले पाटील व मा. मुख्याधिकारी श्री. उमाकांत गायकवाड यांच्या निर्देशानुसार, अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळा व मंदिरांच्या १०० मीटर परिसरात पानपट्टी तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.
या अंतर्गत संबंधित दुकानदारांना प्रथम नोटीस देण्यात येईल. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानांवर दंडात्मक कारवाई तसेच परवाना रद्द करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. ही कारवाई नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभाग, आरोग्य विभाग व संबंधित प्रशासनाच्या संयुक्त पथकाद्वारे करण्यात येणार आहे.

तसेच नागरिकांनीही अशा प्रकारच्या विक्रीबाबत माहिती नगरपरिषदेकडे द्यावी, असे आवाहन नगरपरिषदेकडुन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे व समाजात तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.दरम्यान अंबरनाथ नगरपरिषद नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *