अंबरनाथ

अंबरनाथ मध्ये मुंबईतील मानखुर्द, शिवाजीनगर येथील बायो-मेडिकल कचरा ज्वलन प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

अंबरनाथ , दि . १८ प्रतिनिधी : मुंबई येथील मानखुर्द व शिवाजीनगर येथील बायो मेडिकल कचरा ज्वलन प्रकल्प आता अंबरनाथ च्या एम आय डी सी मध्ये आणण्याचा प्रयत्न सुरु आहे . तर सरकारचा अंबरनाथकरांच्या विरोधात घातक डाव सुरू असुन शासन शांत बसल्याचे दिसुन येत आहे. या बाबत शिवसेनेचे ( उबाठा ) कल्याण उपजिल्हा प्रमुख अनिल लक्ष्मण भोईर यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना लेखी निवेदन देवुन या हा प्रकल्प अंबरनाथमधुन हद्दपार करा अशी मागणी केली आहे.

मुंबईकरांना त्रास होतो म्हणून हा विषारी प्रकल्प अंबरनाथकरांच्या माथी का मारला जातोय? अंबरनाथची जनता माणसं नाहीत का?
हा प्रकल्प म्हणजे मृत्यूचा कारखाना! रुग्णालयातील धोकादायक कचरा रक्ताने माखलेले साहित्य पुरलेल्या सुया, मानवी अवयव , औषधांचे अवशेष हे सर्व जाळून तयार होणार आहे.
विषारी धूर , दुर्गंधी,घातक, रसायने यामुळे क्षयरोग (टीबी )दमा, कर्करोग, त्वचारोग, श्वसनाचे आजार वाढणार म्हणजेच अंबरनाथच्या भविष्यासोबत हे सरकार खेळ खेळत असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे . आधीच रासायनिक कंपन्यांमुळे प्रदूषण सहन करणाऱ्या जांभिवली, जांभीवली पाडा , चिखलोली, ठाकूरपाडा, फणशीपाडा येथील नागरिकांवर आणखी एक अन्याय होवु देणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे. हा प्रकल्प तात्काळ रद्द करा, अन्यथा… रस्त्यावर उतरुन मोर्चे, धरणे, उपोषण करुन वेळ पडल्यास न्यायालयीन लढा देखील लढणार असल्याचे भोईर यांनी सांगितले आहे. “जनतेच्या आरोग्याशी तडजोड होणार नसुन “कचरा प्रकल्प हद्दपार करा अशी मागणी केली आहे. मुंबईतील मानखुर्द–शिवाजीनगर येथील बायो-मेडिकल कचरा भस्मीकरण प्रकल्प अंबरनाथ च्या एम आय डी सी परिसरात स्थलांतरित करण्याच्या हालचालींवरून शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ . बालाजी किणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (उ बा ठा ) पक्षाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अनिल भोईर यांनी जोरदार आणि आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

“अंबरनाथमध्ये बायो-मेडिकल कचरा प्रकल्प होणार नाही” असे सांगून आमदार डॉ.बालाजी किणीकर आणि सत्ताधारी हे जनतेला फसवत आहेत. प्रत्यक्षात आनंदनगर परिसरातील जांभिवली फेज–४ येथे संबंधित कंपनीला भूखंडाचे अधिकृत अलॉटमेंट देण्यात आले असून त्या ठिकाणी प्रकल्पाचे बांधकामही सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जनतेला एक सांगणे आणि मागच्या दाराने प्रकल्प सुरू ठेवणे हा अंबरनाथकरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार असल्याचा आरोप भोईर यांनी केला आहे . “सत्ताधाऱ्यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नये. अंबरनाथची जनता भोळी नाही. जर हा प्रकल्प तात्काळ रद्द केला नाही, तर अंबरनाथच्या जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि या प्रकल्पाला कायमचा विरोध केला जाईल,” असा इशाराही अनिल भोईर यांनी दिला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *