अखेर नितीन नबिन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
14 डिसेंबर 2025 ला कार्यकारी अध्यक्ष बनवलेले नितीन नबिन यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. बिहार मधील बांकीपूर मतदार संघाचे आमदार असलेले नितीन नबिन यांना नवीन जबाबदारीच्या कुठल्या पगार मिळणार नाही पण ते ज्या पक्षाचे धोरण सांभाळणार आहेत…
२५ वर्षांच्या संघर्षानंतर मुंबई महापालिकेत कमळ फुलले
मुंबई, दि. १६ प्रतिनिधी: मुंबई महापालिकेच्या निकालामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी पार पडली. बहुतांश ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होताना दिसत आहेत, सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबई महानगरपालिकेतही भाजपने सत्ता मिळवली आहे….
मतदानावर संशयाचे सावट;मतदारयादीत मोठ्या प्रमाणात छेडछाड; अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये सत्ताधारी पक्षाचे अॅप असल्याचा आरोप
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरू असतानाच तिच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका केली. मतदान अधिकाऱ्यांच्या मोबाईल फोनमध्ये सत्ताधारी…
तिळगुळाच्या गोडीत मतांचं गणित! मकरसंक्रांतीच्या आडून उमेदवारांचा ‘सांस्कृतिक’ प्रचार
दिपक कैतके,विशेष प्रतिनिधी | मुंबई:निवडणुकीच्या आदल्या दिवशी आलेली मकरसंक्रांत उमेदवारांसाठी जणू सुवर्णसंधीच ठरली आहे. सणाचा उत्साह आणि मतदानाचा ताण यांच्या मधल्या अवकाशात उमेदवारांनी प्रचाराची एक नवी, अधिक शिताफीनं आखलेली वाट शोधली असून, महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मकरसंक्रांतीच्या वाणाचा प्रभावी वापर…
आमदारकी निसटली, महापालिकेची ‘लास्ट चान्स’!
विधानसभेत पराभूत चेहरे BMC रणांगणात; मुंबईत सहा ‘कमबॅक’ उमेदवार केंद्रस्थानी विशेष प्रतिनिधी | मुंबई:विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले काही परिचित चेहरे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा निर्णायक डाव टाकताना दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून, विविध पक्षांतील सहा…
निवडणूक तोंडावर, तरीही नाशिक काँग्रेस ‘नेतृत्त्वाविना’; दिग्गजांची अनुपस्थिती, कार्यकर्त्यांत अस्वस्थता
विरोधकांचा प्रचार रणसंग्राम, काँग्रेसवर मात्र शांततेचे सावट विशेष प्रतिनिधी | नाशिक:निवडणुकीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना, काँग्रेसमध्ये मात्र अस्वस्थ शांतता आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांनी प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात…
राष्ट्रवादापासून दूर जात असलेली काँग्रेस
(डॉ. प्रवीण डबली) भारतीय राजकारणात राष्ट्रवाद हा केवळ घोषणा किंवा भाषणांचा विषय नाही, तर तो संघटन, विचारसरणी आणि जमिनीवरील काम यांचा समन्वय असतो. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी अलीकडेच आरएसएस–भाजपच्या संघटनात्मक ताकदीबाबत केलेली टिप्पणी याच वास्तवाकडे बोट दाखवणारी आहे….
ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीत फडणवीस, शिंदे टार्गेटवर
मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत जन्म घ्यावा लागतो : राज ठाकरे राज्यकर्त्याचे प्रेम राज्यावर असावे, सत्तेवर नाही : उद्धव ठाकरे मुंबई : सत्तेवर असणाऱ्ऱ्यांना स्वतःचे घर भरायचे आहे, त्यांना जनतेचे काही देणेघेणे नाही. सध्या सुरू असलेली निवडणूक सत्ता आणि पैशाच्या जोरावर…
पैशाने मतदार विकत घेऊ पाहणाऱ्यांना निवडून देऊ नका…!
अशा ‘ अविरोध’ पेक्षा या पदांचा लिलावच करा: ज्येष्ठ संपादक प्रकाशभाऊ पोहरे यांचा संताप… अकोला: पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे दृष्ट चक्र सध्या सर्वत्र बघायला मिळते. सत्ता मिळविण्यासाठी वाटेल त्या मार्गाचा अवलंब केला जात आहे. लोकशाहीचे असे सार्वत्रिक वस्त्रहरण…









