भिवंडीच्या सत्तेचा ‘सस्पेन्स’ संपला; भर्र रस्त्यात भाजपचा गड ढासळला, काँग्रेसच्या चाणक्यनितीने बंडखोर बसले गादीवर!
विशेष प्रतिनिधी:भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत आज अशा काही नाट्यमय घडामोडी घडल्या की, भलेभले राजकीय पंडितही चक्रावून गेले. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना सत्तेची चावी कोणाकडे जाणार, या प्रश्नाचे उत्तर अखेर भाजपच्याच घरातून फुटलेल्या बंडाने दिले आहे. भाजपचे बंडखोर नेते…
संगीता राजेंद्र खांडेकर चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर; उपमहापौरपदी प्रशांत आनंदराव दानव यांची निवड
चंद्रपूर १० फेब्रुवारी – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांच्या निवडीसाठी मा. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र…
नवी मुंबईच्या महापौर पदी सुजाता पाटील उपमहापौर पदी दशरथ भगत
नवी मुंबई:महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला….
कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात मुंबईत हिशोब चुकता; भाजप शिंदेंना उपमहापौरपदही नाकारणार का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ७ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाच, सत्तेच्या वाटपावरून युतीत ठिणगी पडली आहे. ‘कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये…
आरक्षण डावलून ‘बहिणीं’ना मिळालं गुलाल? शिंदेंचा ठाणे-कल्याणमध्ये मोठा ‘गेम’; पुरुषांची पत्ती कट करून महिलाराज कसं आलं?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘लाडकी बहीण’ शब्दाचा मोठा गाजावाजा आहे, पण आता सत्तेचा खरा रिमोटही याच बहिणींच्या हाती देण्याचा धाडसी निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महापालिकांच्या महापौर निवडीत शिंदेंनी असा…
मुंबईचा महापौर ‘दिल्ली ठरवणार’! भाजपची ठाम भूमिका; युतीतील सामंजस्य राखत फडणवीसांची तारेवरची कसरत
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाचा पेच आता शहराच्या चौकटीबाहेर जाऊन थेट राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. “मुंबईत महापौर भाजपचाच”—अशी ठाम भूमिका भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने घेतल्याचे संकेत मिळत असून, हा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे महायुतीतील…






