राज-शिंदे भेटीने मातोश्री सावध; उद्धव ठाकरेंकडून ‘त्या’ तीन विश्वासू शिलेदारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या अनपेक्षित वळणे पाहायला मिळत आहेत. गुरुवारी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या गुप्त चर्चेने राजकीय वातावरण तापले असतानाच, उद्धव ठाकरे यांनी आपला ‘गनिमी कावा’ वापरत तातडीने मोठा निर्णय घेतला…
मुंबई महापालिकेच्या ‘तिजोरी’वर भाजपचा ‘शिवसैनिक’ बसणार; प्रभाकर शिंदेंच्या रूपाने जुन्या अनुभवावर पक्षश्रेष्ठींचे शिक्कामोर्तब!
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या राजकारणात सत्तेची खरी चावी मानल्या जाणाऱ्या ‘स्थायी समिती’च्या अध्यक्षपदासाठी भाजपने अनुभवी चेहरा मैदानात उतरवला आहे. मूळचे शिवसैनिक असलेले आणि सध्या भाजपमध्ये सक्रिय असलेले प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली असून, ते आज आपला उमेदवारी…
कल्याण-डोंबिवलीच्या बदल्यात मुंबईत हिशोब चुकता; भाजप शिंदेंना उपमहापौरपदही नाकारणार का?
विशेष प्रतिनिधी, मुंबई:मुंबई महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी सज्ज असलेल्या भाजपने मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. ७ फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असतानाच, सत्तेच्या वाटपावरून युतीत ठिणगी पडली आहे. ‘कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगरमध्ये…
विरोधकांवर तुटून पडणारे नितेश राणे शिंदेंसमोर नतमस्तक? आक्रमक राणेंचा सूर अचानक का बदलला?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:राजकीय मैदानात आपल्या जळजळीत टीकेने समोरच्याला निरुत्तर करणारे भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे यांच्या वागण्यातील एका मोठ्या बदलाने सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेहमी आक्रमक पवित्रा घेणारे आणि ‘कट्टर’ हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाला घाम फोडणारे नितेश राणे…
महागाईशी दोन हात अन् देशसेवेची संधी; इंधन बचतीचा ‘हा’ कानमंत्र तुमचा खिसा आणि देशाचं भविष्य कसं बदलणार?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:सध्याच्या काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणि जागतिक राजकारण यांचं एक अतूट नातं तयार झालं आहे. अशातच, “इंधन बचत ही केवळ पैशांची बचत नसून ती एक महान देशसेवा आहे,” असा मोलाचा संदेश राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी…
मुंबईच्या रस्त्यावर आता ‘मराठी’ विरुद्ध ‘तमिळ’ संघर्ष पेटणार?
भाजप आमदाराने राज ठाकरेंना ‘एक लाख’ लोकांच्या मोर्चाचा इशारा का दिला? विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे वारे अजून शांत झाले नाहीत, तोच शहरात प्रादेशिक अस्मितेचा नवा वाद उफाळून आला आहे. सायन-कोळीवाडा येथील भाजप आमदार तमिळ सेल्वन यांनी मनसे अध्यक्ष…
मुंबईच्या महापौर निवडणुकीत ‘राज’ फॅक्टर संपला? भाजपला पाठिंबा देण्याच्या चर्चांवर ठाकरेंनी कसं ओढलं पाणी?
विशेष प्रतिनिधी | मुंबई:मुंबई महापालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी महायुतीने कंबर कसली असताना, मनसेचे इंजिन भाजपच्या डब्याला जोडलं जाणार का? या प्रश्नाने गेले दोन दिवस मुंबईचं राजकीय वातावरण तापलं होतं. सत्ताधाऱ्यांकडून मनसेला रेड कार्पेट अंथरलं जात असतानाच, राज ठाकरे यांनी…
अजितदादांच्या एक्झिटनंतर ‘पॉवर गेम’ला वेग; विलीनीकरणाचा धसका की सत्तेचा अट्टाहास?
दिपक कैतके:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी सध्या जी राजकीय ‘एक्सप्रेस’ धावत आहे, तिने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एका बाजूला अजितदादांच्या अस्थींचे विसर्जनही झालेले नाही, तर दुसरीकडे मुंबईत सत्तेच्या सारीपाटावर नव्या चाली रचल्या जात…
चंद्रपूरचा गड राखण्यासाठी ‘मातोश्री’वर खलबतं! वडेट्टीवार-ठाकरे यांच्यातील ३० मिनिटांची चर्चा; ‘किंगमेकर’च्या भूमिकेवरून नवा ट्विस्ट?
मुंबई प्रतिनिधी:चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर सत्तेचा पेच अधिकच गडद झाला असून, आता राजकारणाचे केंद्रबिंदू मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थान ठरले आहे. काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये…
काँग्रेसकडून भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
मुंबई प्रतिनिधी:मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने शनिवारी कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर…










