स्वीकृत नगरसेवक पदी प्रथमेश सोमण यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
एकनाथ शिंदे यांचा प्रशांत ठाकूर यांना थेट फोन शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि पक्षाचे पनवेल मधील तरुण सुशिक्षित नेतृत्व ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रथमेश सोमण यांनी आज शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला….
गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त खारघरमध्ये ‘हिंद-दी-चादर’ भव्य कार्यक्रम; सर्व धर्म समानतेचा संदेश – मंत्री माधुरी मिसाळ
पनवेल (प्रतिनिधी) सर्व धर्म एकच आहे आणि जो दुसऱ्या धर्माचा सन्मान करतो तो धर्म नेहमी मोठा होतो, असे प्रतिपादन राज्याच्या अल्पसंख्यांक विकास व औकाफ राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांनी आज खारघर ओवे येथे केले. हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या नयना प्रकल्पाबाबत प्रशासनाची हलगर्जी?
दहा वर्षांपासून रखडलेला विकास; नागरिकांत संताप पनवेल : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी २०१३ मध्ये जाहीर केलेल्या ‘नयना’ (NAVI Mumbai Airport Influence Notified Area) प्रकल्पाबाबत प्रशासनाची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दीर्घकाळ प्रलंबित…
‘हिंद दि चादर’ कार्यक्रमानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून सुशोभीकरण
पनवेल : “हिंद दि चादर” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका उद्यान विभागाकडून खारघर परिसरातील सर्कल व दुभाजकांचे विशेष सुशोभीकरण करण्यात आले आहे. आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे तसेच उपायुक्त नानासाहेब कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे पूर्ण करण्यात…
अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २ इसमांना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील भगत चाळ परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २ इसमांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार रुपये किमतीची मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी सागर जोसेफ (वय…
पनवेलमधील डान्सबारांवर कारवाई कधी? प्रशासनाने तात्काळ भूमिका स्पष्ट करावी
पनवेल : मुंबईनंतर नवी मुंबई व कोकणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल शहरात डान्सबार व कथित अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वारंवार कारवाई झाल्याच्या बातम्या समोर येतात; मात्र दुसऱ्याच दिवशी हे डान्सबार पुन्हा सुरू होत असल्याचे…
कामोठे मधील इंडो स्कॉट स्कूलचे मैदान दुमदुमले देशभक्तीपर घोषणांनी
श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्त “भारताच्या नकाशाची मानवी प्रतिकृती साकार” नवी मुंबई,दि.24(विमाका):- हिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम निमित्ताने आज पनवेल…
एआयच्या गैरवापरातून शिकाऊ अनुज्ञप्तीप्रकरणी गैरप्रकार उघड प्रशांत ठाकूर यांचा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न
पनवेल (प्रतिनिधी): उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसताना आरटीओ एजंटांच्या माध्यमातून शिकाऊ अनुज्ञप्ती (लर्निंग लायसन्स) मिळवण्याचे प्रकार उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. काही ठिकाणी…
पनवेल शहर वाहतूक शाखेतील ‘त्या’ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान
पनवेल दि. २४ ( वार्ताहर ) : पनवेल शहर वाहतूक शाखेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा नवी मुंबई पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे . पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पद हालचाली आढळून आल्याने वाहतूक पोलिसांनी केलेल्या एका कारची तपासणी केली असता त्यात…
बौद्धजन पंचायत समिती शाखा महाडची नवी कार्यकारिणी जाहीर
बौद्धजन पंचायत समिती महाड – बिनविरोध निवड महाड तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखेची निवडणूक बिनविरोध पार पडली असून नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांवर संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महाड तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती शाखेची निवडणूक शांततेत व…










