मंत्र्यांचे ‘कार्ड’ सक्तीचे, प्रशासनाचा ‘नकार’; एसटी प्रवाशांच्या सवलतीचा नक्की खेळ कुणी मांडला?
मुंबई, विशेष प्रतिनिधी:लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांच्या सवलतीबाबत सध्या मंत्रालयात एक अजब ‘कात्री’ लागली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना मिळणाऱ्या सवलतीच्या तिकिटांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) बंधनकारक करण्यावरून शासन आणि प्रशासन समोरासमोर आले असून, या गोंधळात सर्वसामान्यांचे मरण…
बळीराजासाठी सरकारी तिजोरी उघडणार!
कर्जमाफीसाठी ६ हजार कोटींची मागणी; थकीत ‘FRP’ वरून कारखान्यांनाही दिला इशारा मुंबई: राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने’च्या अंमलबजावणीसाठी सन २०२६-२७ या आगामी आर्थिक वर्षात तब्बल…
मराठीला ज्ञानभाषेत रूपांतरित करू! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात विशेष कार्यक्रम मुंबई प्रतिनिधी:जगामध्ये ज्ञानभाषा असलेल्या भाषा पुढे प्रवाहित होत असल्याचा इतिहास आहे. ज्या भाषेतून व्यवहार चालतो, रोजगार मिळतो, ती भाषा प्रगतीचा भाव जागृत करते. त्यामुळे आपल्या अभिजात मराठी भाषेला ज्ञानभाषेत रूपांतरित करू, असा…
अविघटनशील प्लास्टिक फुलांवरील बंदी कठोर करणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
दादरच्या फूल व्यावसायिकांचा प्रश्न सोडविणार विधानसभेत लक्षवेधी सूचना मुंबई प्रतिनिधी राज्यात नैसर्गिकरित्या अविघटनशील प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर आधीपासूनच बंदी आहे. ही बंदी अधिक स्पष्ट, परिणामकारक आणि कठोर करण्यासाठी लवकरच स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येईल. तसेच या निर्णयामध्ये केवळ प्लास्टिक फुलांचे उत्पादन…
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येणार अधिक जवळ; सह्याद्रीच्या कुशीतील ‘या’ तीन घाटांचे नशीब पालटणार!
विशेष प्रतिनिधी:कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलली आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला थेट जोडणाऱ्या तीन प्रमुख घाटमार्गांच्या कामांमधील अडथळे दूर करून या प्रकल्पांना युद्धपातळीवर गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम…
अजित पवारांचा विमान अपघात की थंड डोक्याने केलेला घातपात? राज ठाकरेंनी पोलिसांना दाखवला कायद्याचा आरसा!
विशेष प्रतिनिधी:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला उद्या एक महिना पूर्ण होत असतानाच, या प्रकरणाला आता एका खळबळजनक वळणाने वेगळे रूप दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीला जाताना व्हीएसआर कंपनीचे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला….
औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा; राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ बुलडाणा, दि. २५ : आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा केवळ शासन–प्रशासनाचा…
महाराष्ट्रातील ‘सुपर-३०’ साठी जागतिक दारे उघडली! ब्रिस्टॉल विद्यापीठात मोफत शिक्षणाची संधी; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई: आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील उच्च शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहणाऱ्या महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. जागतिक कीर्तीच्या ‘ब्रिस्टॉल विद्यापीठा’मध्ये (University of Bristol) शिक्षणासाठी आता विद्यार्थ्यांना खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
७ हजार कोटींच्या थकबाकीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर टांगती तलवार
गजानन तुपे:मुंबई, दि. २५:आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प सादर होत असतानाच, शिक्षण विभागाबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक असलेला तब्बल ७,२४१.३८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे थकीत…
३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार
गजानन तुपे:मुंबई, दि. २५:मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख…










