टॉप स्टोरी मुंबई

३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार

गजानन तुपे:मुंबई, दि. २५:मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दायित्वापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसंच चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०,९५२.५६ कोटी इतका असणार आहे. २०२५-२६ च्या तुलनेत यंदा ८.७७% ने वाढ यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली आहे. २०२५-२६ चा अर्थसंकल्प ७४,४२७.४१ कोटी इतका अंदाजे होता. मागच्या वर्षीपेक्षा यंदा ६,५२५ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मधल्या काळात महापालिका निवडणुका झाल्या नसल्याने ४ वर्षांनंतर नव्या सत्ताधाऱ्यांचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्र सादर करण्यात आलं. आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी ठाकरेंच्या ठेवी महायुती मोडणार असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलं आहे. एकूण ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी शिल्लक आहेत. त्यापैकी ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.

ठाकरेंच्या ठेवी महायुतीने तोडल्या

मुंबई महापालिका ठेवी मोडण्याच्या तयारीत असून एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी २३ लाख रुपये बांधील दायित्वापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. मात्र, उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुंबई महानगरपालिकेने पूल बांधणीचे काम घेतले हाती
मुंबईत जवळपास एकूण १०१ पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी २४ कामं पूर्ण झाली असून मार्च २०२६ पर्यंत २३ कामे पूर्ण होणार आहेत. २०२६-२७ मध्ये ३१ कामे पूर्ण करण्यात येतील. २०२८-२९ मध्ये २३ पुलांची कामे मुंबई महानगरपालिका पूर्ण करणार आहे.
नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण ९ हजार ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोडच्या ६ व्या टप्प्याचा समावेश आहे.
वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडसाठी एकूण ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी २ हजार ६५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील विविध महानगरपालिका रुग्णालयांसाठी १ हजार ६२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सायन हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, नायर रुग्णालय, वांद्रे कर्करोग रुग्णालय यांच्यासह इतर रुग्णालयांचा समावेश आहे.
मिठी नदीच्या प्रकल्पासाठी २८६.२५ कोटींची तरतूद
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट वाहनतळ प्रकल्प उभारला जाणार आहे. ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट वाहनतळांची उभारणी PPP तत्त्वावर करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात ६,८७५ कोटी रुपये तरतूद केली आहे. कोस्टल रोडच्या बाजूच्या जागेत मुंबई महानगरपालिका हरित पट्टा निर्माण करणार असून जवळपास ५३ हेक्टर क्षेत्रावर उद्यान आणि विकास केला जाणार आहे. यासाठी ९५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

ऑक्टोबरपासून करमणूक कर लागू

महाराष्ट्र शासनाकडून करमणूक शुल्कातून दिलेली सूट ३० सप्टेंबरपर्यंतच लागू असणार आहे. त्यानंतर महापालिका करमणूक कर वसूल करणार आहे. याकरिता महापालिकेनं शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
मुंबईतील फेरीवाल्यांकडे QR कोड आधारित प्रमाणपत्र
मुंबईत फेरीवाल्यांचा विषय चर्चेचा मुद्दा आहे. मुंबईतील फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अर्थसंकल्पातून देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मुंबईतील फेरीवाल्यांकडे QR कोड आधारित प्रमाणपत्र असतील. अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात मोहीम हाती घेतलेली असतानाच आता अधिकृत फेरीवाल्यांना ओळखण्यासाठी QR कोड आधारित प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. यापुढे मुंबई महापालिका क्षेत्रातील अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड आधारित प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहीम तीव्र होणार आहे.

मुंबईकरांची निराशा; पुलकोंडी सुटण्याची चिन्हे नाहीतच

मुंबई महानगरपालिकेनं मुंबईतील तब्बल १०१ पुलांची बांधणी आणि दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. यापैकी २४ कामे पूर्ण झाली. मार्च २०२६ पर्यंत २३ कामे पूर्ण होणार आहेत. २०२६-२७ मध्ये ३१ कामे पूर्ण करण्यात येतील. २०२८-२९ मध्ये २३ पुलांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील ३ वर्षे तरी मुंबईकरांची पुलकोंडीतून सुटका नाही. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण ९ हजार ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून बेस्टसाठी १००० कोटींची तरतूद
मुंबई महापालिकेकडून बेस्टसाठी १००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सन २०१२-१३ पासून सातत्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमास जानेवारी २०२६ पर्यंत १२,०२८.८१ कोटी इतक्या रकमेचे आर्थिक सहाय्य केले आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता बेस्ट उपक्रमास अनुदान म्हणून सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १००० कोटी इतकी तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
मुंबई महापालिका ग्रीन बॉन्डस् वितरित करणार
मुंबई महापालिकेकडून ग्रीन बॉन्डस् वितरित केले जाणार आहेत. मुंबईतील विविध मोठे प्रकल्प व पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याकरिता गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे ग्रीन बॉन्डस् देण्यात येणार आहेत. एकाच वेळी निर्गमित केलेल्या १००० कोटींच्या बॉन्डस् करता केंद्राकडून १०० कोटींचे अनुदान मिळणार आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *