मुंबई

कसा-यात शौर्य दिनी क्रांति स्तंभाच्या प्रतिकृतिस दिली मानवंदना

कसारा :– वंचित बहुजन आघाडी कसारा शाखेचे अध्यक्ष रविंद्र साळवे आणि त्यांच्या सर्व सहका-यांच्या माध्यमातून  भीमा कोरेगाव जय स्तंभाच्या प्रतिकृतीस 1 जानेवारी या शौर्य दिनाचे औचित्य साधुन अभिवादन करण्यात आले.
येथील रेल्वे स्थानक हद्दीतील भव्य प्रांगणावर प्रथमच आयोजित या अभिवादन सभेचे अध्यक्षस्थान रिपाईं (ए ) विभागीय सचिव संतोष कर्डक यांनी भूषविले ; तर संस्कार विधी आणि सूत्रसंचलनाची जबाबदारी अनुक्रमे बौद्धाचार्य प्रमोद जाधव व बळवंत उर्फ प्रज्ञेश सोनावणे यांनी पार पाडली.

या वेळी भीमा कोरेगाव रणसंग्रामा बाबतच्या सत्य इतिहासाबाबत प्रमुख मार्गदर्शक अमर भरीत,पत्रकार दिलीप कांबळे,संतोष कर्डक,पियुष शिंदे,रमाकांत पालवे,बौद्धाचार्य यशवंत गांगुर्डे,सुनील पवार,किरण सोनावणे,आदि वक्त्यांनी उपस्थिताना माहिती देवून शुर वीराना शब्द सुमनांची आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी राजेंद्र खंदारे,अरुण दोंदे,दत्ता कांबळे, धर्मेंद्र गांगुर्डे, अजय दोंदे,विकी कांबळे,भगवान गांगुर्डे,दिलीप सोनावणे,राहुल संतोष ऊबाळे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *