नागपूर मौदा

अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर महसूल विभागाने पकडला

रात्री ११.३० वाजता महसूल पथकाची सिंगोरी येथे कारवाई

मौदा प्रतिनिधी: मौदा तालुक्यात व राष्ट्रीय महामार्ग वरील भंडाऱ्या वरून नागपूरच्या दिशेने दररोज जाणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासनाने मोहीम अधिक कडक केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.३० च्या वेळेस मौदा महसूल पथकाने धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा हायवा टिप्पर पकडला. तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली महसूल विभागातील काही कर्मचारी नागपूर, भंडारा महामार्ग वरील रात्री गस्त घालत होते. रात्री सुमारे ११.३० वाजता त्यांना संशयास्पद रेतीने वाळू वाहतूक करणारा एम.एच. ४० सी.टी ७८८९ क्रमांकाचा हायवा महामार्ग वरील सिंगोरी जवळ टिप्पर दिसला. वाहन थांबवताच अगोदर कागज पत्राची कसून चौकशी केली, त्यामध्ये बेकायदेशीर वाळू भरलेली असल्याचे समोर आले. सदर ट्रक मौदा पोलिस स्टेशन येथे जमा करण्यात आले,
या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी तुषार इडपाते, चालक दिनेश अहिरकर, महसूल सेवक रविंद्र उके यांनी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *