महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. ११ : महापालिकेची निवडणूक शहर विकासाच्या मुद्द्यावर लढली जात आहे. भाजपकडे विकासाचा आराखडा तयार आहे. मतदारांचे एक चुकीचे मत शहराला विकासापासून दूर ठेवू शकते, असे मत महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुने शहर व शिवाजी पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, बळीराम सिरस्कार यांच्यासह भाजप पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.




