टॉप स्टोरी महाराष्ट्र

एसीबी नंतर महाराष्ट्र सदनिका घोटाळ्यात ईडी कडूनही निर्दोष:छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल 850 कोटी रुपयांची अफरातफर केल्याच्या गंभीर आरोपाखाली दोन वर्ष तुरुंगवास भोगलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर ईडीची टांगती तलवार होती. पण आता या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना मोठा दिलासा देत आधी एसीबी आणि आता घडी अशा दोन्ही यंत्रणांकडून भुजबळ आता पूर्णपणे निर्दोष मुक्त झाले आहेत.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामात तब्बल 850 कोटी रुपयांची अफरातफर झाल्याच्या आरोपावरून छगन भुजबळ यांना दोन वर्ष तुरुंगात राहावे लागले होते. त्यांच्यासह 14 जणांची नावे या कथित घोटाळ्यात गुंतली होती. काही काळापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुराव्याअभावी भुजबळ यांना दोष मुक्त केले.

मुख्य गुन्हा सिद्ध न झाल्याने ईडीनेही आता त्यांच्या निर्दोष मुक्ततेचा अर्ज मंजूर करत त्यांना दोषभक्त केले आहे. या क्लीनचीटमुळे भुजबळ आता कायदेशीर कचाट्यातून बाहेर आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *