मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा बैठक घेण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ कुंभमेळा कामांना चालना मिळत नसल्याने साधुमहंतांकडून जोरदार नाराजी आज येथे व्यक्त करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मधील कुंभमेळ्यातील एक प्रमुख महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला येथील दहा आखाड्यांचे प्रमुख महंत आश्रम धारी आणि कुटिया धारी साधू यांनी एकत्र येत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तोंड सुख घेतले.
महंत शंकरानंद सरस्वती महाराज म्हणाले की,
ऑक्टोबर मध्ये कुंभमेळ्याचे ध्वजारोहण होणार आहे असे असताना येथे कामे सुरू नाहीत. अधिकारी येतात आणि गोड गोड बोलून निघून जातात.प्रत्यक्षात कामांना चालणा नाही.आखाड्यात जी कामे सुरू होणार होती ती पाच कोटीची सुरू करावी अशी मागणी करण्यात आली असताना देखील एक कोटीची कामे होणार आहे. त्यातही कामे नगरपालिकाकडे देण्यात आल्याने आखाड्यांनी नाराजी व्यक्त करीत नगरपालिकेला कामे देण्याचा विरोध करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे तातडीने कुंभमेळा बैठक घ्यावी अशी मागणी केली. श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत धनंजय गिरी महाराज व ब्रह्मदर्शनाश्रमाचे महंत रामानंद सरस्वती महाराज म्हणाले की हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा कामे आत्ताच सुरू आहे. परंतु त्र्यंबकेश्वरला कामे सुरू नाहीत. त्यामुळे आश्रम आणि साधू एकत्र आले असून सर्वांना सुविधा दिल्या पाहिजेत याकडे प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली.
श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचे महंत दानमुनी म्हणाले की एप्रिल महिन्यापासून साधू महंत त्र्यंबकेश्वरला येणार आहेत. तत्पूर्वी ध्वजारोहणाला देखील साधू येतील. हिंदुत्ववादी सरकार त्र्यंबकेश्वरकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.नया उदासीन आखाड्याचे महंत गोपालदास म्हणाले की सर्वच कुंभमेळा क्षेत्रावर ज्याप्रमाणे लक्ष दिले जाते त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर मध्ये लक्ष दिले जात नाही. शासनाचे उदासीनता पाहता कुंभमेळा यशस्वी कसा होणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रामकृष्ण आश्रमाचे विश्वरूपानंद महाराज म्हणाले की त्र्यंबकमध्ये ५० च्या वर विविध आखाड्यांचे आश्रम आहेत त्यांच्याकडे देखील भाविक येत असतात तिथे देखील सुविधा दिल्या पाहिजे असे ते म्हणाले.
जुना आखाड्याचे सहजानंद गिरी अग्नि या आखड्याचे महंत दुर्गा नंद ब्रह्मचारी व निर्मल आखाड्याचे महंत गुरु प्रीतसिंह महाकाली आश्रमाचे उदासीन बिंदू महाराज , सोमेश्वर आनंदाश्रमाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज, महंत प्रवीणनाथज महंत विवेकनाथ हे नाथ संप्रदायातील साधू तसेच सिताराम बाबा, कबूतर वाले निर्वाण श्रवण दाजी शुक्रपुरी जय देवगिरी साध्वी तसेच आवाहन आखाड्याचे क्रांतिगिरी महाराज इत्यादी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर येथे तातडीने कुंभमेळा बैठक घ्यावी अशी मागणी केली.
श्री पंचायती निरंजनी आखाड्याचे महंत धनंजय गिरी महाराज व ब्रह्मदर्शनाश्रमाचे महंत रामानंद सरस्वती महाराज म्हणाले की हरिद्वार आणि उज्जैन या ठिकाणी कुंभमेळा कामे आत्ताच सुरू आहे परंतु त्र्यंबकेश्वरला कामे सुरू नाहीत. त्यामुळे आश्रम आणि साधू एकत्र आले असून सर्वांना सुविधा दिल्या पाहिजेत याकडे प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी केली.




