अजित पवार यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान नेता हरपला. हे नुकसान कधीही भरून निघणार नाही. पण, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. ही घटना निव्वळ अपघात आहे. यात कोणतेही राजकारण करू नये,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली.




