महाराष्ट्र

कात्रज दूध संघाचे नाव आता बदलणार? दिवंगत अजितदादा पवारांच्या नावाने होणार संस्थेची नवी ओळख?

विशेष प्रतिनिधी:पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संस्थेचे नाव बदलून ते “अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज” असे करण्याचा ठराव नुकताच संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या सहकार आणि दूध उत्पादक क्षेत्रात अजित पवार यांचे असलेले योगदान लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

कात्रज दूध संघ हा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या उभारणीत आणि विस्तारात अजित पवार यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी संचालक मंडळाने नामकरणाचा हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

हा ठराव आता पुढील कायदेशीर मान्यतेसाठी सहकार विभागाच्या निबंधकांकडे पाठवला जाईल. सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर संस्थेच्या नावाचा बदल अंमलात येईल. या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात अजितदादांच्या कार्याला उजाळा दिला जात आहे.


Deepak Kaitke

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *