नाशिक

काकासाहेबनगर शैक्षणिक संकुलात भव्य मोफत आरोग्य तपासणी महाशिबीर

नाशिक । के के वाघ शिक्षण संस्था, नाशिक, के के वाघ फाऊंडेशन, श्री. बाळासाहेब वाघ वेल्फेअर फाऊंडेशन, स्माईल व स्पिनॅच यांचे संयुक्त विद्यमाने कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांच्या स्मृती प्रित्यर्थ रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे दरम्यान के के वाघ शैक्षणिक संकुल काकासाहेबनगर (रानवड) ता. निफाड येथे मोफत आरोग्य तपासणी महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. राज नगरकर (कॅन्सर रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ), डॉ. प्राची पवार (नेत्र तपासणी तज्ज्ञ), इंदोरवाला हॉस्पिटल तर्फे कान-नाक-घसा तज्ज्ञ, डॉ. स्वनील साखला (फुफ्फुस-छातीविकार तज्ज्ञ), डॉ. संदीप पानगव्हाणे (अस्थिविकार तज्ज्ञ), डॉ विकास कदम (मूत्रसंस्था विकार तज्ज्ञ), डॉ. निनाद थोरात (मेंदू विकार तज्ज्ञ), डॉ प्रशांत बागुल आणि डॉ. पूजा कदम (स्त्रीविकार तज्ज्ञ), डॉ. अमित बोरसे (दंतविकार तज्ज्ञ), डॉ. अतुल पाटील (हृदयरोग तज्ज्ञ), डॉ. गौरव कुलकर्णी (पोट व यकृत विकार तज्ज्ञ), डॉ. रोहन देव (फिजिओथेरपिस्ट), डॉ. श्वेता मुर्तडक (जनरल फिजीशियन) हे नामांकीत डॉक्टर तपासणी करणार आहेत.
यावेळी रानवड, पालखेड, कुंभारी, दावचवाडी, लोणवाडी, आहेरगाव, शिरवाडे वणी, गोरठाण, खडकजांब, रेडगाव, नांदूर खुर्द, वावी, सावरगाव, सारोळे खुर्द, नांदुर्डी, देवपूर, पंचकेश्वर, ब्राम्हणगाव, खडक माळेगाव, खाणगाव, देवरगाव, पिंपळद, हिरापूर या गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, संचालक मंडळ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ व सचिव प्रा. के. एस. बंदी यांनी केलेले आहे. नाव नोंदणीसाठी संदीप शिंदे (9021919467) व ज्ञानेश्वर गवळी (9356797899) यांच्याशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *