अकोट अकोला जिल्हा

हरिनाम सप्ताह मध्ये नामवंत कीर्तनकार व भाविकांची अलोट गर्दी

संत चतुर्भुज महाराज ५० वा सुवर्ण महोत्सव

अकोट तालुका प्रतिनिधी

ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले |
उद्धराया आले दिन जना. ||

श्रीमद् भागवत अखंड हरिनाम सप्ताह मध्ये प्रथम पुष्प गुंफत असताना देवाला आवडेल असं जीवन जगणे, म्हणजेच खरी भक्ती आहे.. भाव विसरून समाधानी वृत्ती ठेवून प्रत्येकात परमात्म्याचे दर्शन करणे, खरी साधना आहे. असे संबोधित करताना द्वितीय पुष्प गुंफतांना सनातन संस्कृतीमध्ये अनेक ग्रंथ अनेक संत अनेक पंथ आणि अनेक भागवंत आहेत… ही आपल्या संस्कृतीची श्रीमंती आहे. पण ह्या सगळ्यांचा सन्मान करून आपली दृढ श्रद्धा एका ग्रंथावर एका संतापायी एका पंथांमध्ये एका भगवंतावर असणे आवश्यक आहे…. असे संबोधित करत तृतीय पुष्पगुंपताना भगवान शंकराचार्य वाहन नंदी आणि पार्वतीचे वाहन सिंह आहे. तरी ते एका ठिकाणी राहतात… महादेवाचा साप आणि गणेशाचा मुषक एकाच परिवारातील सदस्य आहेत.. अर्थात प्रचंड विरुद्ध स्वभावाचे लोक जरी आपल्या परिवारात असले तरी मुख्य व्यक्ती जर महादेवाप्रमाणे स्थिर असेल तर परिवार तुटत नाही… भागवताचा विचार…. भवरोगावर उपचार असे भागवत कथा प्रवक्ते हभप श्री वेदांत महाराज श्रीपर्ण यावेळी सर्व भाविक भक्तांना संबोधित केले,

ब्रह्मलीन परमहंस श्री संत चतुर्भुज महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमद् भागवत नाम सप्ताह व श्रीमद भागवत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्ताने भव्य यावर्षी सुद्धा आयोजन करण्यात आले आहे यावेळी सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार बुधवार हभप प्रवीण महाराज कुलट, गुरुवार हभप पंढरीनाथ महाराज इंगोलेकर, शुक्रवार हभप सुभाष महाराज बोबडे, भाविकांनी कीर्तनकार महाराजांचा सोहळ्यामध्ये अवश्य लाभ घ्यावा व सप्ताहामध्ये काकडा श्रीमद् भागवत कथा वाचन सायंकाळी दररोज हरिपाठ मध्ये वेगळाच विभूतीचा आनंद व्यक्त करायला मिळत आहेत व सर्व येणाऱ्या कीर्तनकार महाराजांचा भागवत समितीकडून शाल श्रीफळ व त्यांचे मानधन देऊन त्यांचा सन्मान होत आहे दररोज सर्व हरिनाम सप्ताह मधील कथा श्रोत्यांना व भाविकांना भोजनाची व्यवस्था केली आहे व रात्री हरी कीर्तनाचा भाविक भक्तगण मोठ्या भावनिकतेणे सहभाग घेऊन या भागवत कथेचा आनंद घेत संतांच्या भावभक्तीत विलीन होऊन भक्ती करत आहेत,

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *