#UrbanPolitics

नवी मुंबईच्या महापौर पदी सुजाता पाटील उपमहापौर पदी दशरथ भगत

नवी मुंबई:महानगरपालिकेच्या महापौर – उपमहापौरपदासाठी आज झालेल्या निवडणूकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तसेच दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पिठासन अधिकारी म्हणून जाहीर केले व त्यांचा अभिनंदनपर सत्कार केला….

‘ड्रीम प्रोजेक्ट’ला धारावीचा धक्का! मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला मतपेटीतून नकार, भाजपचा धारावीत ‘झिरो’

मुंबई प्रतिनिधी :मुंबई महानगरपालिकेत भाजप–शिवसेनेची सत्ता असली, तरी धारावीकरांनी मात्र भाजपला सपशेल नाकारले, अशी स्पष्ट आणि थेट चपराक या निकालातून बसली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून गाजवलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पही भाजपच्या गळ्यात हार घालू शकला नाही. खुद्द…

मुंबईत ठाकरे बंधूंची ताकद वाढली; मराठा मोर्चाचा जाहीर पाठिंबा, महापालिका रणधुमाळीत निर्णायक वळण

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून, मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असतानाच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभेनंतर सत्तासमीकरणांना नवी दिशा मिळाल्याचं चित्र स्पष्ट होत…

ग्रामसत्तेचा फैसला जवळ! १२ जिल्हा परिषद-१२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; आचारसंहिता लागू, राजकीय पक्ष अलर्ट

मुंबई | प्रतिनिधी:राज्यातील ग्रामीण सत्तेचा कौल ठरवणाऱ्या १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे रणशिंग आज फुंकले गेले. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे…

५ वाजेची घंटा, शेवटचा श्वास! महापालिकांच्या रणांगणात आज अखेरचा राजकीय स्फोट; कुणाची कुठे ताकद?

विशेष प्रतिनिधी | मुंबई:घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत—आणि त्याच वेगाने महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या रणांगणातला अंतिम क्षण जवळ आला आहे. गेले १० ते १२ दिवस शहरागणिक रस्ते, चौक, गल्लीबोळ, सभामंच—सगळीकडे राजकीय तापमान उंचावलेलं. उमेदवार असोत वा पक्षांचे दिग्गज, कार्यकर्ते असोत…

आमदारकी निसटली, महापालिकेची ‘लास्ट चान्स’!

विधानसभेत पराभूत चेहरे BMC रणांगणात; मुंबईत सहा ‘कमबॅक’ उमेदवार केंद्रस्थानी विशेष प्रतिनिधी | मुंबई:विधानसभा निवडणुकीत मतदारांनी नाकारलेले काही परिचित चेहरे आता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा निर्णायक डाव टाकताना दिसत आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव पचवून, विविध पक्षांतील सहा…