मुंबई

सरकारी दप्तराचा ‘स्पीड’ वाढला; तुमच्या १५ कामांचा अडथळा आता केवळ एका दिवसात होणार दूर!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:सरकारी कामासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचे दिवस आता संपले आहेत. शिवजयंतीच्या सुवर्णमुहूर्तावर राज्य सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ जाहीर केले असून, महसूल विभागाच्या अत्यंत महत्त्वाच्या १५ सेवा आता अवघ्या एका दिवसात निकाली निघणार आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

खारघरमध्ये ड्रोन शोच्या दिमाखदार रोषणाईने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई (प्रतिनिधी) गोदरेज प्रॉपर्टीजने आपल्या ‘गोदरेज वरण्या’ या नवीन निवासी प्रकल्पाचे खारघरमधील सेंट्रल पार्क येथे एका ऐतिहासिक ड्रोन शोद्वारे अनावरण केले. खारघरमध्ये अशा प्रकारे अत्याधुनिक आणि अनोख्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून रियल इस्टेट प्रकल्पाची घोषणा केली जाण्याचा हा पहिलाच प्रयोग…

निवृत्तीनंतर २० वर्षे ‘मौन’ पाळावे लागणार? केंद्राच्या नव्या हालचालीवर अनंत गाडगीळ यांचा संताप, लोकशाही की हुकूमशाही?

मुंबई | विशेष प्रतिनिधी:निवृत्त सरकारी अधिकारी आणि सैन्यदलातील कर्मचाऱ्यांच्या लेखणीवरच आता केंद्र सरकार ‘टाळे’ लावण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाने संसद हादरल्यानंतर, आता केंद्र सरकार निवृत्तीनंतर…

धाराशिवचा हुरडा अन कोल्हापूरची बर्फी; मोदींच्या ‘हायप्रोफाईल’ टेबलावर रंगला मराठमोळा पाहुणचार!

​मुंबई | विशेष प्रतिनिधी:पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील ऐतिहासिक भेटीची चर्चा जगभरात होत असतानाच, मुंबईतील ‘लोकभवन’मध्ये या दिग्गज नेत्यांनी घेतलेल्या अस्सल मराठी स्वादाची गोष्ट आता समोर आली आहे. भारत-फ्रान्स संबंधांना नवी उंची देणाऱ्या या दौऱ्यात परदेशी…

मंत्रालयातील ‘लाल रेषेचा’ ५० हजारांचा फास; झिरवळांच्या दालनातील त्या ‘सिक्रेट कोड’ने महाराष्ट्र हादरला!

मुंबई | विशेष प्रतिनिधीमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील सत्तेच्या सर्वोच्च दालनात सर्वसामान्यांची कामे फाईलवरील मजकुरावरून नाही, तर एका ‘सिक्रेट कोड’वरून होतात, असा खळबळजनक खुलासा समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगेला लाच घेताना पकडल्यानंतर,…

भारताचा स्वाभिमान अमेरिकेच्या चरणी? सचिन पायलट यांनी उघड केला व्यापार करारातील तो ‘धक्कादायक’ व्यवहार!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:देशाचे हित आणि सार्वभौमत्व गहाण ठेवून केलेला कोणताही करार हा प्रगतीचा मार्ग नसून गुलामीची नवी साखळी आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भारत आणि अमेरिका…

शेतीचा ‘रिमोट’ आता शेतकऱ्याच्या हाती; मुंबईत रंगणार जगातील पहिल्या कृषी-एआय क्रांतीचा महासंग्राम!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:महाराष्ट्रातील पारंपरिक शेती आता कात टाकणार असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) बळावर बळीराजा थेट जागतिक बाजारपेठेशी जोडला जाणार आहे. राज्याच्या ‘कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ अंतर्गत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी ‘एआय…

ठाणे-कल्याणचा ‘ग्लोबल’ अवतार; ४८ हजार कोटींच्या महायोजनेमुळे मुंबईच्या प्रवेशद्वाराचे भाग्य पालटणार!

मुंबई | विशेष प्रतिनिधी:मुंबई महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकणारा एक क्रांतिकारी आराखडा आता प्रत्यक्षात उतरणार असून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. एमएमआरडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल ४८ हजार कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात…

जिमखान्यांच्या ‘रॉयल’ कारभाराला चाप! शासकीय जमिनींवरील मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी राज्य सरकार अक्शन मोडमध्ये

मुंबई विशेष प्रतिनिधी:सरकारी जमिनींवर स्वस्तात जागा मिळवून सर्वसामान्यांना प्रवेश नाकारणाऱ्या जिमखान्यांच्या ‘हायप्रोफाईल’ संस्कृतीला आता राज्य सरकारने चाप लावण्याचे ठरवले आहे. राज्यातील जिमखाना धोरणाचे पुनर्विलोकन करण्यासाठी महसूल विभागाने एका विशेष अभ्यासगटाची स्थापना केली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील ही समिती जिमखान्यांच्या…

सनई-चौघड्याचा निनाद आणि तुतारीचा ललकार; विधान भवनात शिवरायांच्या राजवैभवी सोहळ्याची प्रचिती!

मुंबई, विशेष प्रतिनिधी:विधीमंडळाच्या प्रांगणात आज सकाळी एक वेगळेच चैतन्य पाहायला मिळाले. निमित्त होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाचे. विधान भवनातील महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर पार पडलेल्या या अभिवादन सोहळ्याने शिवरायांच्या राजवैभवी काळाच्या आठवणी ताज्या केल्या. दिवस उजाडताच विधान…